मनोरंजन

डॉ. सान्वी जेठवाणी समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

 

छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती यांचा समाज गौरव पुरस्कार समारंभामध्ये यावर्षीचा समाज रत्न पुरस्कार नांदेड येथील सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व सामाजिक कार्यकर्ता डॉ. सान्वी जेठवाणी यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मान करण्यासाठी आमंत्रित करण्यात आला होता त्यामध्ये किन्नर समाजासाठी आपले अमूल्य योगदान देऊन उन्नतीसाठी काम करणाऱ्या डॉ. सान्वी जेठवाणी यांना विविध मान्यवरांचा हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सदरील पुरस्काराचे उत्तर देत असताना डॉ. जेठवाणी यांनी तृतीयपंथी समुदाय सध्या उन्नतीच्या मार्गावर लागलं आहे त्यासाठी शासकीय व अशासकीय पात्रावर विविध काम सुरू झाले आहेत परंतु हा मार्ग खडतर असून त्याचे फक्त सुरुवात झाली आहे याचे यश मिळण्यासाठी खूप कालावधी लागेल पण आपण नक्की प्राप्त करू असे उद्गारवाचक भाषण यावेळेस त्यांनी केले. या सोबतच उपस्थितांना त्यांनी तृतीयपंथी समुदायाला समाजात उत्तम स्थान मिळावं यासाठी इथे बसलेल्या प्रत्येकांनी मेहनत करावं व भारतीय नागरिक म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनाने आम्हाला देखील समाजात स्थान मिळावा अशी आशा बाळगली.

जेठवाणी यांनी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचे सय्यद साबीर सय्यद सरदार राष्ट्रीय अध्यक्ष यांना आपल्याला पुरस्कार दिल्याबद्दल आभार व्यक्त केले व हा पुरस्कार नांदेडकरांना समर्पित केले. या पुरस्काराप्राप्ती बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button