क्राईम
नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील 150 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत सायबर शाखेची कार्यवाही
नांदेड जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पो.स्टे. सायबर पोनि धिरज चव्हाण यांना आदेशीत केले होते. त्यानूसार सायबर सेल, स्था. गु.शा. व नांदेड जिल्हयातील सर्व पोस्टेचे पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेणेची मोहीम राबविण्यात आली होती.
नांदेड येथील पोलीस स्टेशनचे व स्थागुशाच्या पथकाने जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणी जावून नांदेड जिल्यातील एकूण 150 मोबाईल किंमत 23,40,500 /- रूपयाचे हस्तगत केले आहेत. त्यांचे आज एकत्रितरीत्या मा. पोलीस अधिक्षक साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शोध झालेल्या मोबाईलचे IMEI क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे “Nanded Police” या Facebook Page व Twitter वर टाकण्यात आली आहे. त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखुन सायबर पो.स्टे. नांदेड येथून मोबाईल घेवून जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, नांदेड डॉ. श्री खंडेराव धरणे, भोकर, 4/98. गृह पोलीस उपअधिक्षक श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोनि धिरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.स्टे सायबर पोउपनि एम.बी. चव्हाण, पोलीस अमंलदार सुरेश वाघमारे, राजेन्द्र सिटीकर, दिपक ओढणे, दाविद पिडगे, मोहम्मद असीफ, विलास राठोड, काशीनाथ कारखेडे किशोर जैस्वाल, मोहन स्वामी, दिपक शेवाळे राज यन्नावार, व्यंकटेश सांगळे, दिपक राठोड यांनी पार पाडली. मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी CEIR पोर्टलवर आपले गहाळ झालेल्या मोबाईलची माहित अपलोड करण्याचे अवाहन केले आहे.
सदर कामगीरी बाबत मा, पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार यांनी सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.