मुकामाबाद पोलीसांनी घरफोडीतील तीन गुन्हेगांराना अटक करून 89,930/-रू चा माल केला जप्त…
त्या अनुषंगाने सपोनि श्री भालचंद पदमाकर तिडके, व पोलीस अमलदार मुक्रामाबाद हद्दीत रात्रगस्त करीत असतांना (Operation flush out) अंतर्गत कार्यवाही करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, मी. हंगरगा काटा येथे तीन संशयीत इसम घरफोडी सारखे गुन्हे करण्याचे उद्देशाने संशयीत रीत्या फिरत असल्याची माहीती मिळाल्यान सदर ठिकाणी तात्काळ जावुन त्यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याच नाव 1) अनिल रमेश कांबळे, वय 26 वर्षे, रा. ठाणा कृष्णुर कर्नाटक राज्य ह. मु मुखेड 2) रमेश पोचीराम कडमिचवार, वय 34 वर्ष रा. संतगाडगे बाबानगर,
मुखेड 3) राहुल शंकर कांबळे, वय 24 वर्षे, रा. कृष्णुर ह. मु भवानी मंदीर मुखेड असे सांगीतले परंतु त्यांनी चौकशी दरम्यान गुन्हयासंबंधाने समाधानकारक उत्तर दिले नसल्यामुळे त्यांना अटक करून पीसीआर पंपुन चौकशी केली असता त्यांनी पोस्टे मुक्रामाबाद गुरन 196/2024 कलम 305 331(4), 307, 3(5) मा.न्या.सं-2023 सह कलम 4/25 नाहका प्रमाणे गुन्हाचे कबुली दिली असुन त्यांनी सदर गुन्हयातील नगदी 6.300/-रू व एक खंजीर, लोखंडी रॉड पक्कड इत्यादी साहित्य कावुन दिल्याने ते जप्त केले आहे. व गुरन 16/2024 कलम 457, 380 भादवि हा गुन्हा केला असुन सदर गुन्हयातील जि.प. शाळा मुक्रामाबाद येथील 42 इंची टीव्ही किंमती 33.630/-रू ची जप्त करण्यात आली आहे. तसेच गुरन 168/2024 कलम 305.2024 कलम 305.331 (3) मा.न्या.स-2023 चा गुन्हा केला असुन सदर गुन्हयातील एक बजाज पल्सर कंपणीची मोटार सायकल किंमती 50,000/-रू ची जप्त करण्यात आली आहे. असा एकूण 89.930/-रू या मुद्यमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भाकर, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री संकेत गोसावी, उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग दंगलुर याचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री भालचंद तिडके, पोउपनि अमर केंद्रे, सय्यद चौद, सपोउपनि श्री शेख ताहेर, पोहेको आडेकर, पोकों लुगारे, बगे व ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.