क्राईम

शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन करुन विनापरवाना बेकायदेशिर रित्या दोन गावठी पिस्टल सहा चार आरोपी जेरबंद

दिनांक 11/10/2024 रोजी श्री साईनाथ पुयड, पोउपनि स्थागुशा नांदेड हे त्यांचे टिम मधील अमलदार यांचे सोबत नांदेड शहरातील आसना भागात पेट्रोंलींग करीत असतांना गुप्त बातमीदार मार्फत माहीती मिळाली की, एका SWIFT DZIRE कार मध्ये चार इसम त्यांचे सोबत दोन गावठी पिस्टल व राऊंड घेवुन येत आहेत त्या वरुन स्थागुशा चे पथक 16.00 वाजता पो.स्टे. अर्धापुर हाद्दीतील मौजे पार्डी (म) शिवारात असलेल्या टोलनाक्याजवळ धनश्री कृषीसेवा केंद्र या ठिकाणी जावुन त्यांना मिळालेल्या माहीती प्रमाणे चौकशी केली असता इसम नामे, 1) माधव पि. आनंतराव नंदनकर वय 26 वर्षे व्यवसाय व्यापार पानपट्टीचालक रा. शिवनगर महा राना प्रतापचौक, नांदेड,

2) आकाश आणंतराव साखरे वय 25 वर्षे व्यवसाय चालक रा. सिंचन नगर स्वंयवर मंगल कार्यालय, छत्रपती चौक, नांदेड, 3) चंद्रमुणी मारोती कांबळे वय 23 वर्षे व्यवसाय बेकार रा. जूनी अबादी मुदखेड जि. नांदेड 4) प्रतिक एकनाथ गोरे वय 35 वर्षे व्यवसाय चालक रा. आंब्याच्या झाडाजवळ सिद्धार्थ नगर, चैतन्य नगर, नांदेड यांनी आपसात संगणमत करुन मा. जिल्हादंडाधिकारी साहेब, नांदेड यांनी जारी केलेले शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन करुन त्यांचे ताब्यात विनापरवाना बेकायदेशिर  रित्या दोन गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व अग्नीशस्त्रामध्ये वापरलेले जाणारे पिवळ्या धातूचे चार जिवंत काडतूस एक SWIFT DZIRE चार चाकी वाहन ज्याचा आर.टी.ओ. पासींग नंबर MH- 38-J-3132 असे किमती 3,45,000/- रुपयाचे मुद्देमालासह मिळुन आल्याने दोन पंचा समक्ष जप्त केला आहे.

म्हणुन सदर आरोपी विरुध्द पो.स्टे. अर्धापुर येथे शस्त्र अधिनियम 1959 कलम 3/25, सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास करणे कामी पो.स्टे. अर्धापुर येथे हजर केले अशी स्थानीक गुन्हे शाखेने उत्कृष्ट कामगीरी केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button