जिला

हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयातील दुरुस्तीच्या कामात मुळ अंदाज पत्रकाला फाटा

सक्षम अधिकाऱ्याकडून चौकशी करून एजन्सी व संबंधित गुत्तेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्याची मागणी

हिमायतनगर,  अनिल मादसवार|  हिमायतनगर येथील प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालये या मधील दुसर्‍या माळ्यावर पंचायत समिती, एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय आणि वसंतराव नाईक सभागृह दुरूस्ती व इतर करण्यात येत असलेली विकास कामे ही शासनाच्या मुळ अंदाज पत्रकाला बाजूला सारून अतिशय बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत असल्याने उपलब्ध निधीच्या प्रमाणात करण्यात येत असलेल्या कंची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पुढे आली आहे.

हिमायतनगर शहाराला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर येथे प्रशासकीय इमारत उभी करण्यात आली. सदरची इमारत बांधण्यात येवून अनेक वर्ष उलटली असल्याने डागडुजी अपेक्षित होती. म्हणून शासनाकडून जवळपास एक ते सव्वा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या उपलब्ध निधीच्या माध्यमातून इतर विकास कामे पुर्ण करण्यात येत आहेत. परंतू थातूरमातूर कामे करूण निधी लाटण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न सुरु असल्याचे सुरु असलेल्या कामावरून दिसून येत आहे. येथील खिडक्यांना बसविण्यात येणारी ग्रॅनाईट टाईल्स केवळ सिमेंटचा मालमत्ता लाउ बसविल्याण्यात आली असून, पाण्याने क्युरिंग केली जात नसल्याने वर्षभरात या टाईल्स गाळून पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कामाला जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता हे केवळ एक वेळा भेट देऊन पाहून गेले त्यानंतर आलेच नसल्याचे पंचात समितीतील काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता चांगली नसतांनाही गुत्तेदार अभियंत्यांकडून सुधारीत पद्धतीने मूल्यांकन करून निधी लाटण्याचा प्रयत्न केला जात असून, टक्केवारीची किनार असल्यामुळे की, काय..? बोगस कामाचा सपाटा चालू आहे.

सदरचे काम सुरु असताना कार्यालयात कामानिमित्ताने येणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत असून, टाइल्सला मशीन फिरवताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने त्याचे कण नाका- कानात जाऊन अनेकांना विविध आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहेत. खरे पाहत काम करताना याची सर्व व्यवस्था व कामानिनीत्त येणार्यांना याचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन अंदाजपत्रकाप्रमाणे दर्जेदार मटेरियल वापरून काम करणे अनिवार्य आहे. मात्र या सर्व नियमन फाटा देत काम उरकण्याचा तयारीत गुत्तेदार असल्याचे दिसून येत आहे.

आता आगामी विधानसभेच्या निवडणूकीची आदर्श आचार संहिता कोणत्याही क्षणी लागू शकते, म्हणून ठेकेदार संबंधित विभागांच्या अभियंत्यास हाताशी धरून थातुर माथूर काम करून निधी लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठांकडून या बाबीची गंभीर दखल होणे गरजेचे असून, कामाची गुणवत्ता तपासूनच देयके अदा करावीत. तसेच या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाची सक्षम अधिकाऱ्याकडून सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी व नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या एजन्सी व संबंधित गुत्तेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी सुजाण व नेहमी विविध कामासाठी तहसील पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या विकास प्रेमी नागरीक करीत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button