तृतीयपंथीयांच्या मागण्यासाठी फरीदा गुरूने दिले राज्यपालांना निवेदन
नांदेड/ महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम सी.पी. राधाकृष्ण हे नांदेड दौऱ्यावर आले असता तृतीय पंथीयांची गुरु फरीदा शानूर बकश हिने तृतीय पंथीयांच्या विविध मागण्या संदर्भात राज्यपालांना निवेदन देऊन चर्चा केली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हि भेट घडवून आणली.
महाराष्ट्रातील तृतीयपंथी (किन्नर) याच्या साठी गेल्या 10 वर्षापासून कमल फाउंडेशन नांदेड हि संस्था आहोरात्र परीश्रम घेऊन तृतीयपंथीना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे त्याच भाग म्हणून नांदेड शहरालगत असलेल्या म्हाळजा येथे तृतीयपंथी याच्या स्मशानभूमी व किन्नर भवनासाठी कमल फाउंडेशन या संस्थेने वेळोवेळी शासनास पाठपुरावा करुन सदर म्हाळजा येथील गट क्र 11/1 मध्ये 1.45 आर जमीन किन्नर भवन व तृतीयपंथी यांच्या स्मशानभूमीसाठि जागा मिळवून घेतली यापुढे सदर जागेचा व तृतीयपंथिच्या लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कमल फाउंडेशन हि संस्था शासन व तृतीयपंथी व किन्नर यांच्या मधला दुवा म्हणून काम करण्यासाठी मौ.म्हाळजा ता.नांदेड येथील गट क्र 11/1 मधील 1.45 आर . या जागेवर , कंपाउंड हॉल, रस्ता,व इतर बांधकामासाठी निधी देण्यात यावा यासाठी प्रयत्न करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांना भेटण्यासाठी प्रशासनाने कांही मोजक्या लोकांना बोलावले होते. त्यात तृतीयपंथीयाच्या एका प्रतिनिधीचा हि समावेश होता. तृतीय पंथीयांची गुरु फरीदा शानूर बकश हिने राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. व राज्यपाल यानी तृतीयपंथी गुरु फरीदा शानुर बकश याचे कौतुक केले