शहर

तात्‍पुरता फटाका परवाना देण्यास मुदतवाढ

नांदेड दि. 16 ऑक्टोबर : दिपावली सण 2024 अनूषंगाने तात्‍पुरता फटाका परवाना देण्याबाबत अंशतः बदल करण्‍यात आला असून बुधवार 23 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वर्ष-2024 मध्‍ये दिपावली उत्‍सव 28 ऑक्‍टोंबर ते 3 नोव्‍हेंबर या कालावधीत साजरा होत आहे. त्‍यानुषंगाने नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्‍यामार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्‍याच्‍या कालावधीची मुदतवाढ 23 ऑक्‍टोबर पर्यत देण्‍यात आली आहे. याव्‍यतीरिक्‍त 3 ऑक्‍टोबर रोजी दिलेले जाहीर प्रगटनामधील अटी व शर्ती कायम राहतील, असे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button