किनवट पोलीसांनी अवैध धंदयावर छापा मारून 20,38,000/- रू गुटखा जप्त…
(Operation flush out) अंतर्गत अवैध गुटखा बाळगणारे व वाहतुक करणारे इसमांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोनि श्री बिर्ला व नाईट चेकिंग अधीकारी पोउपनि श्री चाँद व पोलीस अंमलदार असे पोस्टे किनवट हद्दीत शासकीय वाहनाने पेट्रोलींग करीत असतांना गस्त दरम्यान आंबेडकर चौक किनवट येथे आले असता गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, किनवट शहरामध्ये बसस्थानक रोडने एक बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच-26/सीएच-1443 मध्ये गुटखा घेवुन येत असल्याची माहती मिळाल्याने आम्ही सदर वाहनास थांबवुन चौकशी केली.
आरोपी शेख वसीम शेख रजाक, रा. हिमायतनगर यांनी आपले वाहनात विना परवाना बेकायदेशिररीत्या शासनाने प्रतिबंधीत केलेला व शरिरास अपायकारक असलेला विविध कंपणीचा गुटखा किंमती 13,38,000/- रू व वाहन किंमत 7.00.000/-रू असे एकुण 20,38,000/-रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने, पोउपनि श्री चाँद यांचे फिर्यादी वरून पोस्टे किनवट गुरन 272/2024 कलम 132, 223, 275 भा.न्या.सं. सह कलम अन्न व सुरक्षा कायदा मानदे कायदा 2006 ची कलम 26(2). (1).26(2)(4), 27(3) (i) (z), 30(2) सह कलम 59 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री रामकृष्ण मळघणे, उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग किनवट, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री बिर्ला, पोउपनि श्री चाँद, पोकों कुडमेथे, होमगार्ड त्रिमनवार, राठोड, उपलेंचवार, येडके, शेख यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.