क्राईम

पोलिस व उत्पादन शुल्क विभागा ! नांदेड परिक्षेत्रात अवैध दारूविक्री विरोधात संयुक्त कारवाई

 

नांदेड : प्रतिनिधी अवैध दारू विक्रीविरोधात पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने दंड थोपटले आहे. यापुढे दोन्ही विभागाच्या वतीने संयुक्तपणे कारवाई होणार आहेत. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यात नांदेड पोलिस परिक्षेत्रात दोन महिन्यात पाच वेळा एकाच दिवशी केलेल्या कारवाईत १ हजार ३४ केसेस केल्या. तर तब्बल ५९ लाख ६९ हजार ५१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचे पार्श्वभूमीवर, नांदेड परिक्षेत्रातील, उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा मंगळवारी राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नांदेड येथील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात घेतला. याप्रसंगी, नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी मागील दोन महिन्यांत दारूबंदी संदर्भात पोलिसांनी केलेल्या कारवाईची

माहिती दिली. नांदेड परिक्षेत्रातील पोलिसांनी मागील दोन महिन्यात, गावठी दारूचे गाळप रोखण्याकामी एकूण पाच वेळा मासरेड अर्थात एकाच दिवशी विविध ठिकाणी छापेमारी केली. यात गावठी दारू गाळणऱ्या इसमांविरुद्ध एकूण १ हजार ३४ केसेस केल्या आहेत तर तब्बल ५९ लाख ६९ हजार ५१९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती दिली.

विधानसभा लोकसभेच्या आणि नांदेड पोटनिवडणुकीसाठी तेलंगणा व कर्नाटक राज्यांचे सीमेवर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे चार संयुक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. सदर तपासणी नाक्यांवरून परराज्यातील अवैधपणे व कर बुडवून येणारी दारू राज्यात येऊ नये, म्हणून प्रयत्न होणार आहे. याप्रसंगी, उत्पादन शुल्क विभागाचे सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त तडवी, अधीक्षक गणेश पाटील, केशव राऊत, आदित्य पवार व चारही जिल्ह्यातील, पोलीस निरीक्षकांची उपस्थिती, होती. दरम्यान यापुढे अवैध दारू विक्रीविरोधात पोलीस व राज्य उत्पादन ■ शुल्क विभागाच्या वतीने संयुक्तपणेकारवाई केली जाणार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button