सर्व ग्रुप अॅडमिन व सभासद समाजमाध्यम (सोशल मिडीया) यांना नांदेड पोलीस विभागाकडुन आवाहन
नांदेड. दि.23/ ज्याअर्थी आपले गावात शहरात सोशल मिडीया माध्यमातुन एकमेकांशी संवाद साधत आहात. विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 चे अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर दिनांक 15.10.2024 रोजी पासुन आदर्श आचारसंहिता लागू असून निवडणुक प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया होणार असून दरम्यान मा. जिल्हाधिकारी, नांदेड यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हास्थळ सिमेच्या हद्दीमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम अन्वये 37 (1) (3) चे प्रतिबंधक आदेश तसेच भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध घालण्यात आले आहेत.
त्याअर्थी मतदान प्रक्रिया व प्रचारादरम्यान आपणास खालीलपैकी कोणतेही गैरकृत्य परावृत्त होणेकरीता खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
1) कोणत्याही उमेदवाराशी संबंधित त्याचे वैयक्तीक, कौटुंबिक अगर सामजिक स्तरावर अवहेलना होईल असे आक्षेपार्ह टिकाटिपण्णी करणे मजकुर फोटो, व्हिडीओ, (एडिट मार्किंग) करून प्रसारीत करणे अथवा आलेल्या संदेशावर आपले आक्षेपार्ह मत प्रकट करणे व पुढे पाठविणे.
2) मतदाराचे मन वळविण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक भाषिक तसेच जातीत व्देष पसरविणारे आक्षेपार्ह मजकूर फोटो, व्हिडीओ, (एडिट मार्किंग) करून प्रसारीत करणे,
3) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे स्वतंत्र सोशल मिडीया ग्रुप तयार करून त्याव्दारे आक्षेपार्ह मजकूर फोटा, व्हिडीओ, (एडिट मार्किंग) करून प्रसारीत करणे अथवा कृत्य करणे.
4) कुठल्याही व्हॉटसअप ग्रुपमध्ये आचारसंहितेचा भंग होईल अथवा दोन गटात वाद होईल अशी पोस्ट अथवा मजकूर फोटो, व्हिडीओ टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीसह ग्रुप अॅडमीन जबाबदार असणार आहे.
वरील सुचनांचे पालन करणे हे आपल्याला बंधनकारक राहिल आपलेकडून आदर्श आचारसंहिता भंग झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येऊन आपले विरूध्द कडक कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.