क्राईम

नायगाव पोलीसांनी मौ. मांजरम येथील मंदीरातील दानपेटी चोरीचे ०३ आरोपीतांना केले अटक

 

 

 (Operation flush out) अंर्तगत सर्व प्रभारी अधिकारी यांना माली गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. दि.०९/०९/२०२४ चे रात्री ०९.०० वाजता ते दि.१०/०९/२०२४ चे सकाळी ०५.०० वाजताचे दरम्यान मौजे मांजरम येथील शेषेराव व्यंकटराव मंगनाळे यांचे शेतातील महादेव मंदीरातील दानपेटी कोणीतरी अज्ञात चोटयांनी फोडुन त्यातील अंदाजे ३०,०००/- रुपये रक्क्म चोरुन नेले होते. सदर प्रकरणी सुभाष हावगीरराव मंगनाळे वय ५८ वर्षे रा. मांजरम ता. नायगाव यांचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन नायगाव येथे गु.र.न.२२८/२०२४ कलम ३०५ भा.न्या. संहिता प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तपास श्री अजित कुंभार, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नायगाव यांचे मार्गदर्शनाखाली श्री प्रकाश अमृता पंडीत हे करीत होते.

दि.१२/०९/२०२४ रोजी तपास पथकातील पोउपनि प्रकाश पंडीत व पोकॉ/३१२ बालाजी शिंदे यांना गुप्त् बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मांजरम येथील महादेव मंदीरातील दानपेटीतील रक्कम चोरलेले आरोपी मांजरम येथील असुन सध्या मांजरम येथे असल्याची माहीती मिळाली. सदर बाबत वरीष्ठांना माहीती देवून मांजरम येथुन आरोपी १. बाजीराव गोविंदराव शिंदे वय ३२ वर्षे रा.मांजरम यास ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवून मांजरम येथील महादेव मंदीरातील दानपेटीतील रक्कम चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार २.गोविंद विठल शिंदे वय ३६ वर्षे रा.मांजरम ता. नायगाव

३. शरद धनराज शिंदे वय २२ वर्षे रा. मांजरम ता. नायगाव यांचे सह मिळुन केल्याचे कबुल केल्याने मांजरम येथुन आरोपी २) गोविंद विठल शिंदे वय ३६ वर्षे ३) शरद धनराज शिंदे वय २२ वर्षे दोघे रा. मांजरम ता. नायगाव यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्याने गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर तीन आरोपीचे ताब्यातुन १२६० रुपये किंमतीचे चांदीचे दागीने व १४०९० /- रुपये रोख रक्क्म असा एकुण १५,३५०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हयात जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपीतांना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीतांना एम.सी.आर.केले आहे.

सदरची कामगीरी मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा.श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, मा.श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री संकेत गोसावी, उप विभागीय पोलीस अधिकारी देगलुर यांचे मार्गदर्शनाखाली श्री अजित कुंभार, पोलीस निरीक्षक, श्री प्रकाश पंडीत, पोलीस उप निरीक्षक, श्री भिमराव कदम, पोलीस उप निरीक्षक पोहेकॉ/११३३ गणपत पेदे, पोहेकों/ ९४१ बाबूराव घरकुलवार, पोहेकॉ/३४९ साईनाथ सांगवीकर, पोकों/३१२ बालाजी शिंदे, पोको/ ८४२बालाजी वामणे यांचे पथकाने केली आहे. सर्व पथकांची मा. पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button