क्राईम

नांदेड शहरातील महाविदयालयीन तरुणांना Nitrosun-१० नावाच्या नशेच्या गोळया पुरवणा-या टोळीचा पर्दाफाश

 दोन आरोपीतांना अटक करुन त्यांचे कडुन एकुण ३९० नशेच्या गोळया व इतर असा एकुण ९७,३००/-रुपयाचा मुद्देमाल जप्त, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील गुन्हे शोध पथकाची कामगिरी, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ‘ऑपरेशन फ्लश ऑऊट’ अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध धंदयावर कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने दिनांक १०/०९/२०२४ रोजी रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांना गुप्त बातमीदारामार्फतीने माहीती मिळाली की, एक इसम त्याचे जवळील स्प्लेंडर मोटार सायकल सह दिपनगर परिसरामध्ये Nitrosun-10 नावाची नशा निर्मान करणा-या गोळयांची अनाधिकृतपणे विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यावरुन रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड, अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक नामदेव भालेराव व गुन्हे शोध पथकाचे पो. उपनि विनोद देशमुख, त्यांची टीम असे दिपनगर, नांदेड येथे जावुन संशयीत इसम विशाल राजीव देशमुख वय २९ वर्षे व्यबसाय मजुरी रा.कृष्णा निवास वामननगर, तरोडा बु.नांदेड यास ताब्यात घेतले व त्यांची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे जवळ Nitrosun-10 च्या १६ स्ट्रीप्स मिळुन आल्या व त्या पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या.

सदर इसमास त्याने वरील Nitrosun-10 गोळया कुठुन आल्या या वावत विचारपुस केली असता त्याने सदर गोळ्या श्रेया मेडीकल आंबेजोगाई जि.विड चा मालक सुनिल चंद्रसेन कोथींबीरे वय २४ वर्षे व्यवसाय व्यापार रा. माळीनगर, आंबेजोगाई जि. बिड यांचे कडुन आनल्याचे सांगितल्याने पोलीस स्टेशन भाग्यनगर डी.बी टीम आंबाजोगाई येथे जावुन श्रेया मेडीकल येथुन Nitrosun-10 च्या २३ स्ट्रीप्स जप्त केल्या आहेत. सदर दोन्ही आरोपीतांना अटक करुन त्यांचे कडून Nitrosun-10 च्या 39 स्ट्रीप्स एकुण 390 गोळया किंमती 27300/-रुपयाच्या व एक स्प्लेंडर मोटार सायकल किमती 70,000/-रुपयाची असा एकुण किंमती 97,300/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे गु.र.नं.446/2024 कलम २२ (बी) व ८ (सी) गुंगीकारक ओषधीद्व्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल असुन पुढील तपास पो. उपनि विनोद देशमुख हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा.श्री खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, मा.श्री सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्रीमती किरितीका सि.एम., सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग नांदेड शहर, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री रामदास शेंडगे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड, गुन्हे शोध पथक प्रमुख विनोद भा.देशमुख, पोहेकों गजानन किडे, पोहेकों प्रदिप गर्दनमारे, पोकों ओमप्रकाश कवडे, पोकों नवनाथ गुट्टे, पोकों सूर्यभान हासे व चालक पोकों केशव तांबोळी यांनी पार पाडली आहे. सदर पचकाचे पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button