बालाजी पाटील खतगांवकर यांच्या ‘परिवर्तन महारॅलीला’ तुफान प्रतिसाद !!
मुखेड : दिनांक १ ऑक्टोबर रोजी शिवसेना जनसंपर्क कार्यालय, मुखेडपासून सुरू झालेल्या ‘परिवर्तन महारॅली’चा समारोप मष्णेर येथे झाला. जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करीत ठिकठिकाणी बालाजी पाटील खतगांवकर यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या लोककलेने आणि महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
“या तालुक्यात रस्त्याचे, बेरोजगारांची, सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी बालाजी पाटील खतगांवकर यांना निवडून द्यायचं आहे. खतगावकर प्रत्येकाची व्यथा जाणून घेत असून ते २ वर्षांपासून विकासाचा आराखडा तयार करत आहेत. विकास करायचा असेल तर बालाजी पाटील खतगांवकर यांना निवडून द्या. ही लढाई कोणत्या पक्षाची नसून सर्वसामान्य माणसांची आहे. ते जनतेचे, शेतकरी, बेरोजगारांचे आणि महिलांचे प्रश्न सोडवण्याचे उमेदवार आहेत. आतापर्यंत निवडून आलेल्यांनी आतापर्यंत काय केले? मतदारसंघातील गरीब माणसांपर्यंत बालाजी पाटील खतगांवकर पोहोचणार आहेत,” असे प्रतिपादन श्री. सुभाषराव काटे यांनी केले.
“मुखेडमध्ये धनशक्तीच्या विरूद्ध जनशक्ती तयार झाली आहे. परिवर्तन हे मतदानाच्या रूपाने झाले पाहिजे. पैशाच्या जोरावर लोकप्रतिनिधी सत्ता भोगत आहेत. सत्तेची भूक असलेल्या माणसाची नशा बालाजी पाटील खतगांवकर उतरवू शकतात. हाटकर समाजानंतर लिंगायत समाजाचे मतदान आता बालाजी पाटील खतगांवकर यांच्या पाठीशी आहे, असे श्रावण नरभागे यांनी स्पष्ट केले.
“ही इतिहास घडवणारी रॅली आहे. मतपेटीतून राजा निर्माण होतो. आम्ही पळणारे नाही. बालाजी पाटील खतगांवकर यांच्यासारखा हिरा तालुक्याला लाभला आहे. येणाऱ्या काळात त्यांच्याकडून विकास होऊ शकतो. त्यांना आपल्याला आमदार करायचे आहे. येथे सर्वसामान्यांची बिकट परिस्थिती झाली आहे. हजारो लोकांचे काम त्यांनी केलीत. सगळ्या क्षेत्रात मुखेड तालुक्याचे नाव येणाऱ्या काळात पुढे येईल. स्वातंत्र्य मिळूनही तालुक्याचा विकास झाला नाही. अनेकांना निवडून दिले तरी हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे. तुमच्यावर कोणतेही संकट येऊ द्या, तुमची आर्थिक परिस्थिती नसेल तर बालाजी पाटील खतगांवकर त्यासाठी खंबीर असतील. जर ते निवडून आले तर त्यांच्याकडून लेंडी धरणग्रस्तांसाठी ११ लाख रुपये घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,” असे आश्वासन श्री. व्यंकटराव पाटील दिले.
“तालुक्याची परिस्थिती भयानक झाली आहे. येथे अजून रस्ते नाहीत. दवाखाना नाही, स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण पण येथे एमआयडीसी नाही. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयासाठी मुखेड तहसील कार्यालयाजवळ जागा निश्चित करण्यात आली आहे. मष्णेरचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय शांत राहणार नाही. येथील सर्व समस्या दूर करून देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल. कोणीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नये,” असे यावेळी स्पष्ट केले. तसेच खतगांवकर यांनी मष्णेर देवाच्या आशीर्वादाने मुखेड आणि कंधार विधानसभा क्षेत्रातील सर्व समाज बांधवांच्या विकासाची शपथ घेतली.
यावेळी श्री. व्यंकटराव पाटील गोजेगावकर (माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद, नांदेड), श्री. अशोक पाटील रावीकर (माजी सभापती), श्री. शंकर पाटील लुटे (शिवसेना ज्येष्ठ नेते), डॉ. रामराव श्रीरामे, श्री. माधव पाटील बामणीकर (मष्णेर देवस्थान प्रमुख), श्री. सुभाषराव काटे (शिवसेना माजी जिल्हा प्रमुख, लातूर), श्री. सौ. मीराताई मुंडे (शिवसेना तालुकाप्रमुख), श्री. गुणवंतराव पाटील हंगरगेकर (शेतकरी नेते), श्री. शिवराज पाटील मसलगेकर (शेतकरी नेते), श्री. काशी पाटील हाक्के, श्री. श्रीकांत काळे (सरपंच बेन्नाळ) यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते.