जिला

नांदेडच्या नागरी सुविधांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार आक्रमक.

माजी मंत्री कमलकिशोर कदम यांचा मनपा प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टीमेटम !

नांदेड- 03/  नांदेडच्या महानगरपालिका प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात नागरी सुविधा पुरवाव्यात अन्यथा आगामी काळात पूनश्च रस्त्यावर येऊन तिव्र जनआंदोलन उभारण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते,माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी आज दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या नागरी सुविधांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष आज चांगलाच आक्रमक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
         नांदेड शहरातील विविध नागरी समस्या निवारणासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले.
माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या नेतृत्वाखालील या धरणे आंदोलनाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी केले होते.
       गुंठेवारीची मुदत वाढवून देण्यात यावी,शहरात शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, शहरातील अर्धवट रस्त्याची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावे,ड्रेनेज लाईनचे काम करताना मोठे पाईप टाकण्यात यावे,सार्वजनिक ठिकाणी पथदिवे बसविण्यात यावे, देगलूर नाका येथील रोड नं. २४ चे रखडलेले काम तात्काळ सुरू करण्यात यावे,शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे आदी जनहितांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी मनपा प्रशासनाला सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने पक्षाच्यावतिने आज धरणे आंदोलन करण्यात आले.
   यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम,रऊफ जमीनदार व शिष्टमंडळाने मनपाचे सहाय्यक आयुक्त गिरीष कदम यांची भेट घेऊन चर्चा केली.त्यावेळी माजी मंत्री कदम यांनी त्यांना नांदेड शहरातील विविध समस्या निवारणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.परंतू,मनपा प्रशासनाने दुर्लक्षीत करून जनतेच्या समस्या वाढविण्याऐवजी त्या निवारणासह जनतेला मूलभूत सुविधा तातडीने पुरविण्याची विनंती केली व त्यासाठी पंधरा दिवसाचा अल्टीमेटम दिला.
याउपरही चालढकल झाल्यास आम्ही पूनश्च रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करु होणाऱ्या परिणामास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहिल असे स्पष्ट केले.
    या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार यांच्याकडून आयोजित या धरणे आंदोलनात पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगांवकर, सौ.कल्पनाताई डोंगळीकर, सिंधुताई देशमुख,डाॅ.परशुराम वरपडे,बालासाब मादसवाड, डि.बी.जांभरुणकर,ॲड.प्रमोद नरवाडे,लक्ष्मणराव भवरे, युनूसखान,पंकज कांबळे . लखनसिंह लागरी,सरफराज अहेमद,निखील नाईक,विक्रम ठाकुर,अतिक बिल्डर, सलमान भाई,विक्की सिंग गिल,महेमुदी पटेल,साजीदा बेगम,साईनाथ दत्ता जाधव,मो. मुदसिर फिरदोस खान,प्रताप कांबळे कामरान खान,कपिल ससाने . आकबर सर,सिद्धार्थ जोंधळे, सुदामभाई,अनिकेत भंडारी, तोफिक कादरी,अकबर चाऊस, मजिद चाऊस, सरदार भाई, जबार भाई,साहिल खान, कृष्णा, मुजिब भाई,सादिक भाई,नदीम भाई,जावेद भाई, जिल्हा जुल्लू हाजी सत्तार भाई, जाफर भाई,इस्लाम चाऊस, खालील पटेल,जफर शेख, साहिल आदी पक्ष पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button