राजकारण

महेश देशमुख तरोडेकर यांच्याकडून नांदेड उत्तर मतदारसंघात.. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देऊन जन आशिर्वाद यात्रेला सूरुवात.

 

नांदेड – 03/ समाजकारणातून राजकीय वाटचालीत अग्रेसर असलेले नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देऊन नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात आजपासून जन आशिर्वाद यात्रेला प्रारंभ केला आहे.


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा मरळक (बु.) येथे आयोजित या कार्यक्रमाला नांदेडचे दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा.रविंद्र चव्हाण,नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा,नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार,नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व आयोजक महेश देशमुख तरोडेकर,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे,राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण भवरे,काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे,तालुकाध्यक्ष निरंजन पावडे,अनु.जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सत्यपाल सावंत,संजय वाघमारे, शरद वाघमारे,कर्णराज कोळेवार, गंगाधर देशमुख आदींसह तातेराव शिंदे,भिवाजी पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे शिवाजी शिंदे,देवराव कदम,ओमकार शिंदे,सोनू शिंदे,सुनिल गायकवाड आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी श्री.विमलेश्वर मंदिर,मरळक (बु.) येथे सर्वांनी दर्शन घेऊन त्यानंतर,येथिल जिल्हा परिषदेच्या विद्यार्थांशी हितगुज केले.तसेच,महेश देशमुख तरोडेकर यांच्याकडून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जि.प.शाळा मरळक (बु.) व (खु.) मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी बोलतांना प्रा.रविंद्र चव्हाण म्हणाले की,शालेय परिक्षासत्र सुरु होत असल्यानेच काॅग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष महेश पुंडलिकराव देशमुख तरोडेकर यांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाण ठेवून त्यांच्यासाठी शालेय साहित्य भेटीचा केलेला सामाजिक उपक्रम स्तुत्य आहे.त्या भेटीचा वापर करतांनाच देशाचा भावी आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थ्यांनी योग्यतेने प्रगतीसह गुणवत्ताधारक व्हावे व स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीत अग्रेसर ठरावे अशी सदिच्छा व्यक्त केली.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनीही यावेळी आपल्या मनोगतातून महेश देशमुख यांच्या या सामाजिक उपक्रमासह जन आशिर्वाद यात्रेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी आयोजक महेश देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकातून आपण समाजकारणातून राजकीय वाटचाल करणारा कार्यकर्ता असल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊनच त्यांना पॅड,पेन, पेन्सील,रबर आदी शालेय साहित्य वाटप करित असल्याचे सांगितले.तसेच,आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आपण काॅग्रेस पक्षाकडून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ईच्छूक असल्याने या मतदारसंघात आजपासून सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन जनतेच्या समस्या जाणून घेत जन आशिर्वाद यात्रा सुरु केल्याचे म्हणाले.
यावेळी स्थानिकचे शिक्षकवृंद,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान शालेय साहित्य मिळाल्याने येथिल विद्यार्थ्यांत आनंद ओसंडून वाहत असल्याचे जाणवले.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपानंतर प्रा.रविंद्र चव्हाण,अब्दुल सत्तार,महेश देशमुख आदींनी स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button