वंचित आघाडीच्या जाहीरनाम्यात मोफत शिक्षण आणि न्याय देण्याचे काम करणार, पत्रकार परिषदेत माहिती देली
मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. अविनाश भोसीकर आणि भोकर विधानसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे सुरेश राठोड यांनी आज दिनांक 09 नोव्हेंबर रोजी शहरातील महात्मा फुले चौक येथील वंचित बहुजन प्रचार कार्यालयात स्थानिक पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची सत्तेत आल्यास केजी टू पीजी पर्यंतचे मोफत शिक्षण सहित इतर आश्वासने प्रसिद्ध निवडणूक जाहीरनामामध्ये केले.
यावेळी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार एडवोकेट अविनाश भोसरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश राठोड यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना सांगितले की वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी नांदेड जिल्ह्यात सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून प्रत्येक समाजातील घटकांना न्याय देण्याचे काम केलेला असून इतर मागासवर्गीय लिंगायत मुस्लिम अशा समाजातील वंचित घटकांना निवडणुकीत वंचित ची उमेदवारी देत समान संधी उपलब्ध करण्याचं काम केलं असून भारतातील राष्ट्रीय पक्षांनी काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टी यांनी जिल्ह्यात कोणतेही प्रकल्प आणून शिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात असमर्थ ठरले,राज्यात वंचित आघाडीच्या जाहीरनाम्यात महिलांना 3500 रुपये मासिक वेतन,वर्षांत तीन सिलेंडर मोफत, सोयाबीन आणि कापूस वेचणी करणाऱ्या मनोरेगांकडून पाच हजार रुपये प्रति किलो वेंचने अनुदान मिळणार,भाजीपाला फळ दूध आणि सर्व पिकासाठी हमीभाव,घरगुती वापराचीं 200 यूनिट वीज मोफत,
चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 5000 रुपये मालिक पेन्शन, केजी टू पीजी शिक्षण मोफत शासकीय पद भरती विद्यार्थ्यांसाठी वर्षभरातील सर्व परीक्षा फक्त शंभर रुपयांमध्ये विद्यार्थी परीक्षक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार ,अल्पभूधारक 50 वर्षांवरील सेतकरी, सेठमजुरांना दरमहा 5 हजार रुपये पेंशन सुरु करणार अशी वचनपूर्ती केली आहे, शहरात बुद्ध वी हारतून मोठी रॅली काढण्यात आली , मठ गल्ली येथे मठात दशर्न घेत , रेल्वे गेट या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे मुदखेड तालुका अध्यक्ष मोहनराव कांबळे, डी.जी चौंदते, वंचित चे बाबुराव कोलते, धम्मदीप चौंदते सहित वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते