राजकारण

छाननीनंतर नांदेड लोकसभेसाठी 39 उमेदवार वैध तर विधानसभा निवडणुकीसाठी 460 उमेदवार वैध

लोकसभेसाठी 2 तर विधानसभेसाठी 55 उमेदवार अवैध, 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज परत घेता येणार

नांदेड, दि. 30 ऑक्टोबर :- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी झाल्यानंतर लोकसभेसाठी 2 तर विधानसभेसाठी 55 #अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे नांदेड लोकसभेसाठी तूर्तास 39 तर जिल्ह्यातील 9 विधानसभेसाठी 460 उमेदवार वैध ठरले आहेत. अंतिम फेरीतील उमेदवारांची आकडेवारी येत्या 4 नोव्हेंबरला ठरणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील 83-किनवट मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 31 उमेदवारांपैकी आज 29 अर्ज वैध ठरले तर 2 अर्ज अवैध ठरले. 84-हदगाव मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 66 उमेदवारांपैकी आज 63 अर्ज वैध ठरले तर 3 अर्ज अवैध ठरले. 85-भोकर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 144 उमेदवारांपैकी आज 140 अर्ज वैध ठरले तर 4 अर्ज अवैध ठरले. 86-नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 81 उमेदवारांपैकी आज 73 अर्ज वैध ठरले तर 8 अर्ज अवैध ठरले. 87-नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 56 उमेदवारांपैकी आज 52 अर्ज वैध ठरले तर 4 अर्ज अवैध ठरले. 88-लोहा मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 35 उमेदवारांपैकी आज 33 अर्ज वैध ठरले तर 2 अर्ज अवैध ठरले.
89-नायगाव मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 35 उमेदवारांपैकी आज 26 अर्ज वैध ठरले तर 9 अर्ज अवैध ठरले. 90-देगलूर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 43 उमेदवारांपैकी आज 27 अर्ज वैध ठरले तर 16 अर्ज अवैध ठरले. तर 91-मुखेड मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 24 उमेदवारांपैकी आज 17 अर्ज वैध ठरले तर 7 अर्ज अवैध ठरले आहेत.
असा आहे निवडणुकीचा पुढील कार्यक्रम :
नामांकन मागे घेण्याची अंतीम तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान तारीख. : 20 नोव्हेंबर
मतमोजणी तारीख. : 23 नोव्हेंबर 2024.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button