सप्तरंग राष्ट्रीय नृत्य व संगीत स्पर्धा महोत्सवाचे सुप वाजले
सप्तरंग सेवाभावी संस्था, लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ,जिल्हा प्रशासन नांदेड ,सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2024 हा कार्यक्रम कुसुम सभागृहामध्ये दोन वेगवेगळ्या रंगमंचावरती सतत तीन दिवस आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या स्टेज वर उद्घाटन सत्र संपन्न झाले या तीन दिवसांमध्ये दिवसभर शास्त्रीय ,उपशास्त्रीय लोककलेमध्ये अनेक प्रकार सादर झाले भरत नाट्यम ,कथक, कुचीपुडी व अगदी दुरून आलेल्या मणिपुरी नृत्यनेही सर्व प्रेक्षकांची मने जिंकली शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा संगीत गायन स्पर्धा तर शेवटच्या दिवशी इंद्रधनु या शासकीय कार्यक्रमाने या कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली कुसुम सभागृहाच्या छत्रपती शिवाजी महाराज भव्य स्टेज व स्वर्गीय पंडित ब्रिजू महाराज स्टेज वरती देशातील बारा राज्यातून आलेल्या साडेपाचशे कलाकारांसह अनेक गुरूंचा गुरु कला उपासक पुरस्काराने सन्मान करण्यात आला व त्यांच्या विविध कलागुणांना भव्य रंगमंचावरती वाव देण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच खुल्या पोवाडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या या पोवाड्यामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या कलाकारांनी सहभाग नोंदवला तर दुसऱ्या स्टेज वरती दक्षिण भारतातील लोककला नांदेडकरांची मन जिंकत होती.
गेल्या अनेक वर्षापासून नांदेड शहरांमध्ये सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव एक राष्ट्रीय मंच म्हणून उदयास आला या कार्यक्रमांमध्ये नाट्य प्रकारातील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी कलाकारांना देशाच्या कानाकोपऱ्यामधून बोलवलं जातं या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका डॉ सानवी जेठवाणी यांच्या अथक परिश्रमामधून कार्यक्रमाला मूर्त रूप प्राप्त झाला आहे हा कार्यक्रम दररोज दोन सत्रामध्ये म्हणजे सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत अविरतपणे चालू असून या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपरातून नावाजलेल्या दिग्गज कलाकारासह आणि दिग्गज गुरुसह हाजरी लावण्यात आलेली आहे हा कार्यक्रम सतत तीन दिवस कुसुम सभागृहामध्ये विविध कला प्रकारातील परीक्षक यांच्या परीक्षणातून प्रथम द्वितीय तृतीय कलाकारांना रोख रकमेसह सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन करण्यात आले या कार्यक्रमाला दररोज सायंकाळी “इंद्रधनु” या विशेष कार्यक्रमात तृतीय पंत्याने सादर केलेले लोककला,
लावणी, नृत्य आणि नाटक यांनी प्रेक्षक भारावून गेले या कार्यक्रमात लावणीच्या आदा प्रेक्षकांना पाहून प्रेक्षक घायाळ झाले अशीच पुढील दोन दिवस सुद्धा लावणे दररोज पाहायला मिळणार आहे सप्तरंग महोत्सव हे केवळ एक नृत्य आणि संगीत प्रकार नाही तर हे भारतीय संस्कृती व विविधता आणि समृद्धी एक जिवंत प्रदर्शन आहे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव आणि आपल्या एक वेगळे स्थान भारतामध्ये निर्माण केला आहे या या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून तमन्ना नायर मुंबई ,कुशल भट्टाचार्य कोलकत्ता , ऋषिकेश पोहनकार नागापूर ,डॉ प्राध्यापक शिवराज शिंदे नांदेड,प्रा नामदेव बोंपीलवार, मिलिंद साळवी मुंबई, शिवा कांबळे चंद्रकांत मेकाले ,प्रा. किरण सावंत ,अजय शेंडगे औरंगाबाद, तर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून
मुख्य संयोजक डॉक्टर सानवी जेठवाणी यांच्यासह शुभम बिरकुरे, अक्षय कदम, श्री डॉ. बालाजी पेनुरकर प्रा डॉ ओमप्रकाश दरक ,लक्ष्मी प्राध्यापक डॉ. लक्ष्मीपुराणशेट्टीवार कविता जोशी डॉ प्रा अश्विनी चौधरी ,गणेश चांडोळकर ,विनायक कदम ,नकुल उपाध्याय ,साईनाथ कुलथे, अजिंक्य धर्माधिकारी, नईम खान, रवी चीनोरक,र अक्षय नरवाडे आणि हरियाणाहून आलेल्या साठ स्वयंसेवकांनी तर नांदेड येथील आय टी एम कॉलेज ग्रामीण पॉलीटेक्निकल कॉलेज येथील 200 विद्यार्थ्यांनी संयोजनाचे काम पाहिले सर्व संयोजकांनी आपापली जबाबदारी पार करून कार्यक्रम यशस्वी केला