दोन धर्मियांमध्ये जाणुनबुजुन जातीय तेढ निर्माण करुन धार्मिक कलह,द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राम गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
किनवट(प्रतिनिधी) दोन धर्मियांमध्ये जाणुनबुजुन जातीय तेढ निर्माण करुन धार्मिक कलह, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करण्याची मागणी किनवटचे पोलीस नीरक्षक यांन निवेदन देऊन करण्यात आली आहे,
रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांनी मौजे पंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक या ठिकाणी सप्ताहा दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलीन होईल, असे जाणिवपूर्वक प्रवचन केले आहे. भारतात एक कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे. दहा-वीस वर्षे ज्यांनी मौलाना म्हणून काम केले आहे.
त्यांनी इस्लामचा सुक्ष्म अभ्यास केला असता, त्यांना यात अन्याय-अत्याचाराशिवाय काहीही आढळून न आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे. मोहम्मद पैगबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला. ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहेत, त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे? अशा स्वरुपात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मियांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्ये रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट, ता. वैजापूर जि. औरंगाबाद यांनी केली आहेत. या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू-मुस्लिम या दोन समाजामध्ये मने कलुषित करुन जातीय तणाव, धार्मिक दवेष पसरवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.
हाल विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामट्या रामगीरी महाराजाकडून मुस्लिम धर्मियांविरोधात “Kinwat जाणुनबुजुन धार्मिक भावना दुखवुन जातीय दंगल घडविण्याच्या इराद्यात व्यक्तव्य करुन घेण्यात येत असल्याचे समजते. तसेच नितेश राणे हा सुध्दा दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवावा म्हणून जाणुनबुजुन चिथावणीखोर भाषण करत आहे. मुस्लिम समाजात अनेक ठिकाणी इज्तेमा होतात त्यामध्ये फक्त इसको समाजात माणूस म्हणुन कसे जगावे याबाबत शिकवण दिली जाते. कोणत्याही धर्म व जाती विरोधाल कोणत्याही प्रकारचे वक्तव्ये केली जात नाही.
भामट्या रामगीरी महाराजाने केलेल्या वक्तव्यामुळे समाज जीवनातील एकोपा, सामाजिक बंधूभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. सध्या गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. पाठोपाठ महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. त्यामुळे आपण समस्येचे गांभीर्य ओळखून रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट, ता.वैजापूर जि. औरंगाबाद यांच्यावर विविध कलमंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी असे निवेदन देण्यात आले या वेळी शेख नजीर शेख शरीफ(उर्फ बाबा भाई),अकरम चव्हाण,जावेद खान दौलत खान,असिफ मिर्झा,अकबर इसा खान,अभय नगराळे, गुड्डू पटेल,अकबर शेख,सद्दाम चाव्हण आदी उपस्थित होते.