मनोरंजन

किनवट माहूर विधानसभेत युवा नेते सचिन नाईक यांना संधी द्या…

 

नांदेड दिनांक15, किनवट माहूर विधानसभेमध्ये गेली आठ वर्षापासून सचिन नाईक मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरजूंना मदतीचा हात सचिन नाईक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येतो सर्व सामान्य मतदार संघातील नागरिकांना कुठलीही अडचण दवाखान्याची असो की लग्नाची त्यासाठी सचिन नाईक मित्र मंडळ हे सदैव पुढे येऊन सहकार्य करण्याची भावना ठेवत असतो त्यामुळे किनवट माहूर विधानसभेमध्ये युवा नेते म्हणून सचिन नाईक यांना संधी द्यावी अशी मागणी किनवट माहूर तालुक्यातील होताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी जवळपास 14 इच्छुक उमेदवार असून विविध पक्षाकडून त्यांनी पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी हालचाली सुरू केले आहेत.

 

पण सचिन नाईक हे मित्र मंडळाच्या माध्यमातून कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीत तरी देखील आम्ही काहीतरी समाजाचे देणे लागतो या हेतूने गेली आठ वर्षापासून काम करत असल्याचा भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत गेली पंधरा वर्षे राहिलेले आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट माहूर विधानसभेमध्ये कुठलाच असा मोठा उपक्रम राबवला नाही की जेणेकरून सुशिक्षित बेरोजगारांना कामाची संधी उपलब्ध होईल जी एमआयडीसी बंद पडलेली आहे ती देखील बंद पडण्यासाठी हेच आमदार जबाबदार होते तर सध्या असलेले विद्यमान आमदार यांनी देखील रस्ते नाल्या शिवाय कुठलेच काम मतदार संघामध्ये केले नाही महाआघाडी सरकारमध्ये असलेल्या आमदारांनी शेतकऱ्यांविषयी एकही प्रश्न विधानसभेत मांडला नसून त्याच्यासाठी तिसरा पर्याय म्हणून युवा नेते सचिन नाईक यांना किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी असे देखील बोलले जात आहे सचिन नाईक यांनी माहूर विजन व किनवट विजन हा कार्यक्रम राबवला होता या कार्यक्रमात किनवट येथील एमआयडीसी चालू करण्याचा मानस त्यांचा आहे.

 

तर सुशिक्षित बेरोजगारांसाठी पतंजली सारख्या मोठ्या ब्रँड सोबत एक फॅक्टरी आणण्याचा देखील आणि एक शुगर फॅक्टरी आणण्याचा त्यांचा मानस आहे असे देखील मतदारसंघांमध्ये बोलल्या जात आहे कुठल्याही पक्षाने तिकीट दिले तर मी किनवट माहूर विधानसभा लढवण्यास तयार असून अन्यथा अपक्ष देखील लढण्यास तयार आहे असे देखील युवा नेते सचिन नाईक ते म्हणाले

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button