किनवट-माहूर विधानसभा मतदार संघ शिवसेना (शिंदे गटाला) सोडण्याची मागणी..
किनवट:- (प्रतिनिधी)किनवट-माहूर विधानसभा मतदार संघ हे शिवसेना शिंदे गटाला सोडावी अशी मागणी किनवट युवासेना तालुका प्रमुख अजय पाटील कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. युवासेना प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे. संपर्कप्रमुख आनंद जाधव. मा.खासदार हेमंत पाटील यांच्याकडे केली आहे.
राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांना किनवट विधानसभेत अवघ्या पंधरा दिवसांमध्ये 62639 मते मिळाली आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून आगामी विधानसभा निवडणुकीत एक दिलाने लढण्यासाठी सज्ज व्हा. किनवट शिवसेना बलाढ्य असल्याने विधानसभेची जागा शिवसेनेला मिळावी. किनवट शिवसेना या मागणीसाठी प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठविला असल्याचे युवासेना तालुकाप्रमुख अजय पाटील कदम यांनी सांगितले. विधानसभा ही शिवसेनेला शिंदे गटाला सोडावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
1990. नंतर 2014 मध्ये ही जागा शिवसेनेला होती त्यामुळे परत एकदा किनवट विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकावा. असे मत पत्रकार परिषदेमध्ये युवासेना तालुकाप्रमुख अजय पाटील कदम व. विधानसभा प्रमुख दया भाऊ पाटील. यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेमध्ये युवा सेनेचे पदाधिकारी रणजीत चव्हाण. राजदीप भोसले. विपिन पवार. चंद्रकांत जिंकलवाड. बालाजी मेश्राम. अक्षय कावळे. दीपक कदम. पवन सरपे. निलेश चव्हाण. सुरेश जाधव. किरण लढे .अतुल खरे. आदी पदाधिकारी उपस्थित होते.