स्काऊट गाईड कार्यालयात चिंतन दिन मोठ्या उत्साहात साजरा
22 फेब्रुवारी हा दिवस स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस हा चिंतन दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने स्काऊट गाईड कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यालयाचे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट श्री प्रलोभ कुलकर्णी, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड श्रीमती भागीरथी बच्चेवार, सहा.जिल्हा आयुक्त स्काऊट श्री रमेश फुलारी ,एच डब्ल्यू बी श्री विनोद सोनटक्के,जिल्हा परिषद येथील श्री पेटकर, त्याचबरोबर ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी येथील श्री कार्लेकर श्रीमती देशपांडे त्याचबरोबर श्रीनिकेतन हायस्कूल, नांदेड येथील श्रीमती सोनकांबळे श्री कळकेकर व या दोन शाळांमधील स्काऊट गाईड सहभागी झाले होते.
याप्रसंगी लॉर्ड बेडन पोवेल यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व स्काऊट गाईड साठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये संगीत खुर्ची, बादलीत चेंडू फेकणे व वस्तू ओळखणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या त्याचबरोबर उपस्थित सर्व स्काऊट गाईंडना प्रशिक्षण आयुक्त स्काऊट आणि गाईड यांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या यावेळी स्काऊट गाईड कार्यालयाचे जिल्हा संघटक स्काऊट श्री जनार्दन इरले, जिल्हा संघटक गाईड शिवकाशी तांडे, श्री विशाल ईश्वरकर, श्रीमती अनुराधा कोटपेट इत्यादी उपस्थित होते