क्राईम
विवाहितेला त्रास दिल्यामुळे सासरच्या सौदागर कुटुंबीया विरुद्ध गुन्हा दाखल
नांदेड दि.4 देगलूर नाका परिसरातील मोहसीन नगर भागात राहणाऱ्या सौदागर कुटुंबीयांकडून त्यांची नवविवाहित सून आयशा एमेन हीस मागील दोन वर्षापासून मानसिक आणि शारीरिक छळ करून त्रास देत आहेत, तसेच पती रियान सौदागर हा वारंवार विवाहितेवर इच्छा नसताना देखील अनैसर्गिक अत्याचार करून त्रास देत होता. त्याचबरोबर घरातील लहान-दीर आणि मोठा भाया हे देखील वाईट उद्देशाने नवविवाहितेच्या शरीराला स्पर्श करून विनयभंग करत होते. याची माहिती सासरे आणि सासूला देऊन सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आणि पती जे सांगेल त्या पद्धतीने वाग अशी ताकीद दिली. हा होणारा अन्याय सहन न झाल्यामुळे आयेशा एमेन हिने पती रियान सौदागर, सासरा सलीम सौदागर, भाया मोहसीन सौदागर, दीर अफनान सौदागर,नंद आणि नंदोई हिना खान, सुलेमान खान यांच्या विरोधात कलम 377, 354-A, 223, 294, 498, या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गोविंद दिलीपराव चक्रधर हे करत आहेत.