महाराष्ट्रा

तरुणीने तरुणाला भररस्त्यात भोसकलं; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जळगाव, 8 मे : जळगाव शहरातील अजिंठा चौकात एक धक्कादायक घटना घडली. भरदिवसा एका तरुणीने शिवीगाळ करत एका तरुणावर चाकू हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

जळगाव शहरातील अजिंठा चौकात हॉटेल महिंद्राजवळ एका तरुण-तरुणीचा गोंधळ सुरु होता. याच वादात काही वेळाने तरुणीने छोटा चाकू काढला, आणि तरुणाला शिवीगाळ करत त्याच्या छातीवर वार केले, यात चाकू लागल्याने तरुणाच्या छातीतून रक्ताची धार लागली, तरीही तरुणी त्याच्यावर चाकूने वार करत होती. यादरम्यान तरुण हा तरुणीकडील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. या वादात तरुणाने त्याचे अंगावरील शर्ट फाडून टाकला. तरुण तरुणीला माझा मर्डर करुन टाक असे, आव्हान करत असल्याचे दिसून येत आहे. तरुणी त्याच्यावर चाकूने वार करत असल्याचे दिसून येत आहे.

पोलिसात कुठलीही तक्रार नाही

या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. मात्र, आपसात वाद असेल, तसेच तरुणीचा संताप अन् तिच्या हातात चाकू बघून कुणाचीही हे भांडण सोडविण्याची हिंमत झाली नाही. तब्बल अर्धा ते पाऊण तास भररस्त्यावर हा गोंधळ सुरु होता. तरुण दारुच्या नशेत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान दोघांचीही नावे कळू शकलेली नाहीत. यादरम्यान तरुणी संबंधित तरुणाबद्दल व्हिडीओमध्ये सांगत आहे, यात संबंधित जखमी तरुणही दिसून येत आहे. यात ती तरुणी स्वत: बोलत आहे. सदरच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडीयाच्या एका साईटवर अपलोड झाला, ज्या खात्यावर हा व्हिडीओ अपलोड झाला, ते खाते एका महिलेचे आहे. त्यावरुन व्हिडीओ डाऊनलोड करण्यात येवून काही वेळातच हा व्हिडीओ व्हाटस्अप व्हायरल झाला. काही वेळाने मूळ साईटवरुन हा व्हिडीओ डिलीट झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेप्रकरणी काल उशीरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नसल्याचेही समोर आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button