श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचा औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकांचा निरीक्षण दौरा पूर्ण
श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी दिनांक 05 मे रोजी औरंगाबाद आणि दिनांक 06 मे, 2023 रोजी जालना रेल्वे स्थानकांचे निरीक्षण केले.
प्रथमतः त्यांनी औरंगाबाद रेल्वे स्थानकाला भेट दिली, ज्यात वेटिंग रूम, बाळ नर्सिंग रूम आणि इतर प्रवाशांच्या सुविधा, स्वच्छता यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मालधक्का औरंगाबाद ला भेट दिली. तसेच औरंगाबाद रेल्वे स्थानकाची पूर्ण पाहणी केली. तसेच त्यांनी सी.एम.आय.ए. च्या पदाधिकार्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.
तसेच श्रीमती सरकारी यांनी मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (MASSIA) सोबत बैठक घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली.
दिनांक 6 मे रोजी त्यांनी मुकुंदवाडी आणि करमाड रेल्वे स्थानकाला भेट दिली. करमाड रेल्वे स्थानकावर माल धक्का बनविण्याकरिता दूर आणि अल्पावधीतील लाभांच्या संभावानांची चर्चा केली. 139 किलोमीटर वर असलेल्या भुयारी पुलाची पाहणी केली. तसेच AURIC अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि विविध क्षेत्रातील जवळपासच्या उद्योगांना भेटी दिल्या. तसेच गुड्स शेड आणि इतर सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या भविष्यातील आवश्यकतांचे मूल्यांकन करण्यासाठी दिनेगाव (DIQ) स्टेशन आणि जवहालाल नेहरू ड्राय पोर्ट (JNPT) ची तपासणी केली
जालना येथील स्थानिक पोलाद उद्योग प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आणि स्क्रॅप-टू-टीएमटी स्टील प्लांटला भेट दिली.
दौर्याच्या अंतिम टप्प्यात जालना येथील महत्वाच्या पिटलाईन प्रगतीचा आणि इतर चालू कामांचा आढावा घेतला.
या दौऱ्यात इतर विभागीय अधिकारी श्रीमती नीति सरकार यांच्या सोबत होते.