जिल्हा परिषद सार्वत्रिक बदल्या पहिल्याच दिवशी विविध विभागातील 63 कर्मचा-यांच्या बदलत्या
नांदेड, 8- नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचा-यांच्या सार्वत्रिक बदली प्रक्रिया समुपदेशनाव्दारे जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू आहेत. आज सोमवार दिनांक 8 मे रोजी महिला व बालकल्याण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, कृषी, पशुसंवर्धन व वित्त विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आज एकूण 63 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
महिला व बाल कल्याण विभागातील पर्यवेक्षीका पदाच्या 11 बदलत्या करण्यात आल्या यात प्रशासकीय 5 तर विनंतीवरून 6 बदल्यांचा समावेश आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता संवर्गात प्रशासकीय 2 तर विनंतीवरून 2 अशा 4 बदल्या करण्यात आल्या. बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या 9 बदल्या झाल्या. 3 प्रशासकीय तर 6 विनंतीवरुन बदली करण्यात आली. स्थापत्य अभियंता सहाय्यक पदासाठी प्रशासकीय 2, विनंती 3 अशा 5 बदलत्या झाल्या.
कृषी विभागातील विस्तार अधिकारी कृषी या पदाच्या 4 बदल्या झाल्या असून यात प्रशासकीय कारणावरून 1 तर विनंतीवरून 3 जणांचा समावेश आहे. पशुसंवर्धन विभागातील 22 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी प्रशासकीय 2, विनंती 1, पशुधन पर्यवेक्षक पदाच्या प्रशासकीय 11 तर विनंतीवरून 8 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. वित्त विभागात 8 बदल्या झाल्या. यामध्ये विनंतीवरुन सहाय्यक लेखा अधिकारी 1, कनिष्ठ लेखा अधिकारी संवर्गात प्रशासकीय 1 तर विनंतीने 2 तर वरिष्ठ सहाय्यक लेखा पदाच्या विनंतीवरुन 4 बदल्या झाल्या.
बदली प्रक्रियेत यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, ए.आर. चितळे, अशोक भोजराज, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी भाग्यश्री भोसले, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी शेखर कुलकर्णी, डॉ. अरविंद गायकवाड आदींची उपस्थिती होती.
आज आरोग्य विभागाच्या बदल्या
नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचा-यांच्या सार्वत्रिक बदली प्रक्रिया समुपदेशनाव्दारे जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरु असून आज मंगळवार दिनांक 9 मे रोजी आरोग्य विभागातील विविध संवर्गातील कर्मचा-यांच्या बदली प्रक्रियेला सकाळी 10 वाजल्या पासून सुरवात होणार आहे. तर उद्या बुधवार दिनांक 10 मे रोजी ग्रामपंचायत विभागाच्या बदल्या पार पडणार आहेत.