जिला

शुभेच्छांचा विनापरवाना अनधिकृतरीत्या बॅनर लावाल तर थेट कारवाई होणार

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक तसेच नऊ विधानसभांची मतमोजणी शनिवारी सकाळी सात वाजेपासून नियोजित स्थळी होणार आहे. दुपारी वारा वाजेपर्यंत निकालाचे साधारणतः चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. नांदेड उत्तर आणि नदिड दक्षिण विधानसभा नदिड महापालिके अंतर्गत येतात. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीचा भागही समाविष्ट आहे. या निकालानंतर नांदेड महापालिका हद्दीत विजयी उमेदवारांचे होर्डिंग, बॅनर लावले जाण्याची शक्यता आहे. मात्र संपूर्ण राज्यात हे शुभेच्छा फलक, पोस्टर, बॅनर, झेंडे, भित्तीपत्रके विनापरवानगी लावू नयेत असे मुंबई उच्च न्यायालयाने १८ नोव्हेंबर २०२४ रोजी आदेश दिले आहेत. या आदेशाची नदिडमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश नदिड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे

यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिका हद्दीमध्ये विनापरवानगी तथा अनाधिकरित्या जाहिरात होर्डिंग, पोस्टर, बॅनर, किऑस, झेंडे, भित्तीपत्रके लावणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४, २४५ व महाराष्ट्र महापालिका आकाशचिन्हे व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण नियम २०२२ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र विदुषण प्रतिबंध कायदा १९९५ नुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, याची नागरिक आणि सर्व राजकीय पक्षांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे निर्देश उपायुक्त तथा नोडल अधिकारी स. अजितपालसिंघ संधू यांनी राजकीय पुढाऱ्यांसह पदाधिकारी, नागरिकांना दिले – आहेत. बावावत संपूर्ण क्षेत्रिय अधिकाऱ्यांना शहरात  कुठेही विनापरवानगी होर्डिंग, बॅनर, पोस्टर लावल्यास संवधितावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे उपायुक्त संधू यांनी दैनिक एकमतशी बोलतांना सांगितले.

दरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे परंतु महापालिका या आदेशाची कशी अंमलबजावणी करते हे पाहणे जास्त महत्वाचे ठरणार आहे. कारण यापुर्वी सुद्धा अनाधिकृत बॅनर आणि होल्डींग संदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्याचे पालन योग्य रितीने झाले नव्हते. मुंबई येथील होल्डींग दुर्घटनेनंतर सुद्धा न्यायालय व शासनाचे आदेश आले, परंतू नऊ दिवस नवरीचे या प्रमाणे कारवाई करून महापालिका मोकळी झाली. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण करण्याचे काम राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अतिउत्साही लोकांकडून अजूनही सुरूच आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची महापालिका कितपत अंमलबजावणी करणे हे बेणाऱ्या काळात दिसून येईल..

 न्यायालयाच्या आदेशानंतर मनपा उपायुक्त अजीत पाल सिंघ संधू यांनी दिला इशारा

नांदेड लोकसभेसह विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे. निकालानंतर शुभेच्छाबाबतचे अनाधिकृतरित्या जाहिरात होर्डिंग, बॅनर, पोस्टर लावू नयेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी प्रशासनास दिले आहेत. यानुसार शहरात अनाधिकृतपणे होर्डिंग, बॅनर लावल्यास थेट कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे उपायुक्त स. अजितपालसिंघ संधू यांनी राजकीय पुढाऱ्यांसह नागरिकांना दिला आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button