फळविक्रेते आणि फेरीवाले यांच्या लाऊड स्पीकर ने नांदेडकर बेजार
नांदेड दि.8 मागील काही दिवसापासून नांदेड शहरातील अनेक फळ विक्रेते आणि फेरीवाले हे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिजिटल लाऊड स्पीकर चा वापर करत आहेत आणि जागोजागी मोठ्या आवाजात शंभर रुपये एक किलो 100 रुपये दोन किलो असे रेकॉर्डिंग केलेले आपल्या उत्पादन विषयक माहिती कर्णकर्कश आवाजात वाजवत आहे त्यामुळे नांदेडकर बेजार झाले आहेत बहुतांश हे विक्रेते मोठ्या रस्त्याच्या कडेला आपले लाऊड स्पीकर लावत आहेत त्यामुळे वाहन चालकांचे लक्ष विचलीत होऊन अपघात होण्याचाही धोका संभवतो याकडे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करत आहेत प्रशासनाने वेळेत याकडे लक्ष देऊन कर्णकर्कश आवाज करणाऱ्या अशा लाऊड स्पीकर चा वापर करणाऱ्यांवर योग्य ती कारवाही करून ध्वनी प्रदूषण नियंत्रणात आणावे अशी मागणी नागरिकातून होत आहे