देश विदेश

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

 

मुंबई, दि. २५ ऑक्टोबर २०२४ राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्यापैकी गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील १९ अमलबजावणी यंत्रणांनी एका दिवसात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची कामगिरी बजावली आहे. विविध ठिकाणी वापरलेले पोलिस विभाग आणि इतर यंत्रणाची तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.

१ ) इन्कमटॅक्स डिपार्टमेन्ट- 30,93,92,5731-

२) व्हयून्यू इन्टेलिजन्स – 8,30,84,878/-

३) राज्य पोलीस डिपार्टमेंट-8,10,12,811/-

४) नार्कोटिस्ट कंन्ट्रोल ब्यूरो- 2,50,00,000/-

) राज्य उत्पादन शुल्क विभाग 1,75,00,392/-

५ ६) कस्टम डिपार्टमेंट 72,65,745/-

टिव्सभरात झालेल्या कारवाईमध्ये नागपूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी ह्या जिल्ह्यांमधल्या मोठ्या कारवायांचा समावेश आहे. ह्यातून निवडणूक यंत्रणा दक्ष असून मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश गेला आहे. प्रत्येक प्रकरणाचे मागील धागेदोरे तपास काढून गुन्ह्याची साखळी मोडून काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सर्व मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या सीव्हिजील अॅपवर तक्रार करता येते. ह्या तक्रारीची माहिती सर्व अंमलबजावणी यत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.

प्राप्तीकर विभागाचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत घनशक्तीचा वापर करुन मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आयकर विभाग देखील पुढे सरसावला आहे. राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकाच्या काळात धनशक्तीचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने प्राप्तीकर विभागाने मुंबई इथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हा नियत्रण कक्ष आठवड्‌याचे सातही दिवस चोवीस तास सुरु असेल. या नियंत्रण कक्षाकडे नागरिक १८००२२१५१० हा टोल फ्री क्रमाक ८९७६१७६२७६ आणि ८९७६१७६७७६ या व्हॉट्सअप क्रमांकावर किया mumbai. addidit. inv7@incometax.gov.in या ईमेलवर आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. नागरिकाली टिलेल्या माहितीच्या आधारावर प्राप्तीकर विभागान्नारे जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.

सी-व्हिजिल अॅपवर आचारसंहिता भंगाच्या ११४४ तकारी प्राप्तः यापैकी ११४२ निकाली १५ ते २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) अॅपवर एकूण ११४४ तकारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ११४२ तकारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सजग नागरिकाना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) अॅप हे कोणत्याही अॅपस्टोअरमधून करता येते. या अॅपव्दारे नागरिकाना आचारसंहिता भगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकान्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button