राजकारण

विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नांदेडमध्ये व्यापक जनजागृती

स्वाक्षरी मोहिमेत प्रधान सचिव एकनाथ डवले यांचा सहभाग; मतदान करण्याचे केले आवाहन

 

नांदेड,24- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी मतदान करावे, यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी काल नांदेड जिल्हा परिषदेमध्ये मतदान जनजागृती साठी स्वाक्षरी मोहीम राबवली. यावेळी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन स्वाक्षरी केली.

त्यांनी यावेळी लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डाॅ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, भोजराज, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण घुले आदींची यावेळी उपस्थिती होती.

श्री एकनाथ डवले यांच्या उपस्थितीने जिल्ह्यातील मतदान जनजागृती मोहिमेला एक नवे बळ मिळाले. त्यांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होत, मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने लोकशाही सुदृढ करण्याच्या उद्दिष्टाने समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेत मतदानाविषयी जागृती निर्माण करणे आणि आगामी निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीपकक्ष, उमेद व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी मोहिम घेण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कुलकर्णी यांनी केले यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, कार्यालयीन अधीक्षक द्वारकादास राठोड, बालाप्रसाद जंगिलवाड, अरुण चव्हाण, माधव भिसे, हनमंत कंदुरके, स्वप्निल कुलकर्णी, अतिश गायवाड, बालाजी गिरी यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button