स्वच्छ भारत मिशनच्या 10 व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ, विशेष मोहीम 4.0 ही सुरू करण्यात आली. कामाच्या ठिकाणी स्वच्छता वाढवणे, शाश्वत पद्धतींना चालना देणे आणि प्रलंबित बाबींचा निपटारा करणे इत्यादि विषयी माननीय पंतप्रधानांचे ध्येय साध्य करण्यासाठी विशेष मोहीम 4.0 सुरू करण्यात आली.
विशेष मोहीम 4.0 च्या मुख्य लक्ष्यांमध्ये सार्वजनिक तक्रारींचे त्वरित निराकरण करणे, कामाच्या ठिकाणी स्वच्छता वाढवणे, शाश्वत पद्धतींना चालना देणे आणि प्रलंबित बाबींच्या निपटाराला अनुकूल बनवण्याच्या दृष्टीकोनातून साध्य करण्यासाठी विशेषत: Rail Madad आणि CPGRAMS सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे समाविष्ट आहे. या मोहिमेच्या निमित्ताने ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेअंतर्गत रोपे लावण्यात आली.
त्याचाच एक भाग म्हणून, नांदेड रेल्वे विभागाने 01 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या थीमसह स्वच्छता पखवाडा स्वच्छता मोहीम पाळली. नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानकांमध्ये आणि कार्यशाळांमध्ये शालेय मुले, स्काउट आणि गाईड, स्वयंसेवी संस्था इत्यादी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागाने पंधरवडा स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून स्वच्छता प्रतिज्ञा, श्रमदान, वृक्षारोपण कार्यक्रम, वॉकथॉन, स्वच्छता विषयक जनजागृती रॅली, प्लॅस्टिक कचऱ्याबाबत जनजागृती मोहीम आणि एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी, नुक्कड नाटके इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन रेल्वे स्थानक, वसाहती येथे करण्यात आले.
स्थानक परिसरात स्वच्छता सुधारण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विभागातील 85 रेल्वे स्थानकांवर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले. स्वच्छता पखवाडा मोहिमेदरम्यान संपूर्ण विभागामध्ये एकूण 145 किलोमीटर रेल्वे ट्रॅकची स्वच्छता करण्यात आली. अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी आदींसह सुमारे 2000 लोकांनी रेल्वेच्या विविध आवारात श्रमदान उपक्रमात सहभाग घेतला. कार्यक्षेत्रातील 55 गाड्या समाविष्ट करून अधिकारी आणि पर्यवेक्षकांद्वारे नियमित स्वच्छता तपासणी करण्यात आली. कचरा विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून, 400 व्यक्तींना रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांवर कचरा टाकण्याविरूद्ध समुपदेशन करण्यात आले.
नांदेड विभागाने पंधरवड्याच्या मोहिमेदरम्यान विभाग आणि कार्यशाळांमध्ये 73,836 झाडे लावली. विभागातील विविध कार्यालयांमध्ये स्वच्छ परिसार उपक्रम (स्वच्छ कार्यस्थळ आणि स्वच्छ निवासी परिसर) साजरा करण्यात आला आणि कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छतेवर जनजागृती करण्यासाठी, 24 वेबिनार/सेमिनार आयोजित केले गेले आणि सुमारे 2200 लोकांचा सहभाग होता.
या स्वच्छता मोहिमीत श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक / नांदेड, श्री राजेंद्र कुमार मीना / अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, श्री एल. सांबशीव राव / मुख्य प्रोजेक्ट व्यवस्थापक (गती शक्ति), डॉक्टर चेलगिरी / मुख्य चिकित्सा व्यवस्थापक, नांदेड आणि इतर अधिकऱ्यांनी भाग घेतला.