महाराष्ट्र राज्य तेलगू साहित्य अकादमी सदस्यपदी श्रीनिवास गुंडारी
Mumbai: महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य तेलगू साहित्य अकादमी सदस्यपदी श्रीनिवास गुंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
तेलगू साहित्यात विशेष योगदान असलेले श्रीनिवास गुंडारी हे महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट या संघठनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत .
महाराष्ट्र राज्य तेलगू साहित्य अकादमी सदश्यांची नियुक्ती नुकतीच महाराष्ट्र् शासनाने केली असून यावर संचालक सचिन निंबाळकर यांच्यासह कार्याध्यक्ष डॉ पी व्ही रामण्णा , सदस्यपदी श्रीनिवास गुंडारी
रवीन्द्र संगेवेणी , अशोक कंटे , हरेश कैची , श्रीमती रेणुका बुधाराम , गजानन बेंजकीवार ,सतीश खाणकाम आणि श्रीनिवास कंदकुरी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
श्रीनिवास गुंडारी यांची या महत्वाच्या समितीवर नियुक्ती करण्यात आल्याने महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट या संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले .