लोकसभे मध्ये मांडण्यात आलेल्या वक्फ बोर्ड बिल रद्द करण्याची मागणी.
किनवट:-(प्रतिनिधी) राज्या-राज्यांतील वक्फ बोर्डांना नियंत्रित करणाऱ्या कायद्यातील बदलाचं दुरुस्ती विधेयक गुरुवारी केंद्र सरकारने लोकसभेत मांडलं. या विधेयकाला विरोधकांकडून तीव्र विरोध करण्यात आला.त्याचाच भाग म्हणून किनवटमध्ये आदिवासी विद्यार्थी कृती समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष विकास कुडमते यांच्या नेतृत्वात देशाचे राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांना उपविभागीय अधिकारी किनवट यांच्या मार्फत एक निवेदन देण्यात आले ज्या मध्ये वक्फ बोर्ड बिल रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि या निवेदनात महणले आहे की देशातील मुस्लिम समाजाच्या हिताकरिता वक्फ बोर्डची स्थापना करण्यात आलेली आहे. वक्फ बोडांची कार्यप्रणाली राज्यघटनेच्या अधिन आहे. त्याची कार्यपध्दती देशातील मुस्लिम समाजाच्या हिताची आहे.
दि. 08/08/2024 रोजी लोकसभेमध्ये मांडण्यात आलेल्या वक्फ बोर्ड संदर्भात बिलामुळे देशातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या तसेच हे बिल मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे, असे दिसुन येत आहे. त्यामुळे देशातील मुस्लिम समाजात असुरक्षेतेची भावना निर्माण झाली आहे.
तरी देशाचे महामहिम राष्ट्रपती यांनी हे बिल रद्द करावी ही मागणी करण्यात आली आहे.
ये वेळी विकास कुडमते,शेख नजीर (उर्फ बाबा भाई,),वंचितचे निखिल वाघमारे,अभय नगराळे,नवीन जाधव,राहुल कापसे,दिनेश कांबळे,निसार शेख,दिनेश कांबळे,अकरम चव्हान,अब्दुल्ला चाउश ,शेख सलाम भाई,इलियास शेख, आदींची स्वाक्षऱ्या आहेत.