ऑल इंडिया अलमा बोर्डच्या मराठवाड्यातील शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे यांची भेट
परभणी ऑल इंडिया ऑल बोर्डच्या सेक्रेटरी मौलाना जाहीर अब्बास कासमी यांच्या नेतृत्वात मराठवाड्यातील मुस्लिम समाजातील सर्व धर्मगुरूंनी मनोज जरांगे यांची भेट घेतली भेट घेऊन सुरू असलेल्या आरक्षणा च्या संघर्षात आम्ही पहिल्यापासून आपल्या समाजासोबत आहोत व आरक्षण मिळेपर्यंत मुस्लिम समाजाचा पाठिंबा राहणार असल्याचा ऑल इंडिया उलमा संघटनेच्या सेक्रेटरी मौलाना जाहीर अब्बास कासमी यांनी बोलताना सांगितले विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ही भेट असून आपण जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असून पण मुस्लिम समाजाला सुद्धा न्याय देण्यात यावा जिथे जिथे मुस्लिम कॅंडिडेट निवडून येतील त्या त्या ठिकाणी आपण आपल्याकडून मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याच्या प्रयत्न करावा अशी प्रमुख मागणी घेऊन ऑल इंडिया उलमा संघटनेचे सेक्रेटरी व पदाधिकारी यांनी अंतरवेली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली
मनोज जरांगे ने उत्तर देताना सांगितले समाज जो निर्णय घेईल त्याच्यावर सर्व निर्भर असेल व पहिल्यापासून मुस्लिम समाजाने मराठा समाजासोबत आरक्षण च्या लढ्यात खांद्याला खांद्या लावून उभे राहवल्याबद्दल आभार मानत येणाऱ्या 20 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले व जर विधानसभेसाठी आम्ही उमेदवारी दिली तर मुस्लिम समाजाला सुद्धा न्याय देऊ असे ऑल इंडिया उलमा बोर्डच्या सदस्यांना आश्वासन दिले
यावेळी ऑल इंडिया उलमा बोर्ड नवनियुक्त सेक्रेटरी मौलाना जाहीर अब्बास कासमी, मौलाना जागीर नदवी, मौलाना अब्दुल खुद्दूस मिली, मौलाना हाफेझ इल्यास, हाफेझ अब्दुल जब्बार, मुजाहिद खान, आरिफ खान व पूर्ण मराठवाड्यातील ऑल इंडिया उलमा बोर्डच्या पदाधिकारी सदस्य उपस्थित होते