विज्ञान प्रदर्शनात बाल वैज्ञानिकांची मांदियाळी मोरया फाउंडेशनच्या
परभणी/प्रतिनिधि – शहरातील मोरया फाउंडेशन च्या वतीने कृषी विद्यापीठ गेट रोडवरील अक्षदा मंगल कार्यालयात रविवारी (दि.10) रोजी सायंकाळी 4 ते 7 वेळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रेरणा समशेर वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्ञानसाधना प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, प्रतिष्ठानच्या सचिव तथा सिनेट सदस्य व बोर्ड मेंबर शितल सोनटक्के, आयएपी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप कार्ले ,आयोजक फाउंडेशनचे सचिव डॉ.अभिजीत चिद्रवार,अध्यक्षा डॉ. भावना चिद्रवार आदिंची उपस्थिती होती. हंट फॉर ज्युनिअर सायंटिस्टचे चौथे वर्ष असून यामध्ये जिल्ह्यातील 40 शाळातील जवळपास 150 विद्यार्थ्यांनी प्रयोग साहित्याची मांडणी केली होती.
तसेच जवळपास दोन हजार पालकांची उपस्थिती होती.विज्ञान प्रदर्शनात चौथी ते सातवी गटातुन प्रथम ऑक्मे इंग्लिश स्कूलचे सुजित भवर, तेजस गिराम, संस्कृति कदम, असावरी खाडे, द्वितीय ओयासिस इंग्लिश स्कूलची समृद्धी बोराळकर,तृतीय जिजाऊ ज्ञानतीर्थचे जयंत राखोंडे,स्वरूप शिवभगत,सूरज पोंढे, सुरज कोल्हे,आदर्श मचाले तर उत्तेजनार्थ समरजीत कारेगावकर, माऊली भवर, मानसी सोळंके आणि आठवी ते दहावी गटातुन प्रथम एकता नगर गांधी विद्यालय संस्कार देशमुख,द्वितीय सेंट ऑगस्टीनचे ओम वडणेकर,मो.अली, तृतीय एकता नगर गांधी विद्यालय आर्यन फटाळे तर उत्तेजनार्थ स्कॉटिश अकॅडमीची श्रेया आवचार,सेलु ची सोनल क्षीरसागर यांनी पारितोषिक पटकावले. सर्व यशस्वी बालवैज्ञानीकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक,सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनासाठी डॉ. बी.जे.भोसले,डॉ. कदम,डॉ. भूतडा, श्रीमती डॉ. लाभसेटवार, प्रसन्न भावसार,संजय ढवळे अदिनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. रामप्रसाद देशमुख तर आभार आयोजक तथा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्त्रीरोग तज्ञ डॉ. भावना चिद्रवार यांनी मानले.
जिल्ह्यतून बालवैज्ञानिक निर्माण व्हावेत- डॉ. अभिजीत चिद्रवार
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण होऊन त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा. पुस्तकाच्या बाहेर जावून त्यांनी केलेले नवनवीन संशोधन पुढे यावेत. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून जिल्ह्यात नवनवीन बालवैज्ञानिक निर्माण व्हावेत हिच हंट फॉर ज्युनिअर सायंटिस्टच्या मागची भूमिका असल्याचे प्रास्ताविकातुन आयोजक तथा मोरया फाउंडेशनचे सचिव बालरोग तज्ञ डॉ.अभिजीत चिद्रवार यांनी सांगितले.