चित्रकला व रांगोळी स्पर्धेत 46 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग
मतदार जनजागृतीसाठी स्वीपच्यावतीने विविध उपक्रमाचे आयोजन
नांदेड दि. 31 ऑक्टोबर : 16-नांदेड लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी 87-नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने आतापर्यंत नवनवीन उपक्रम घेण्यात येत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान जनजागृती करण्याचा संकल्प केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज 31 ऑक्टोबर रोजी जि.प.हायस्कुल मुलांच्या शाळेतील प्रशस्त भव्य मैदानात खुल्या चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ही स्पर्धा विविध अशा खुल्या तीन गटात संपन्न झाली. सर्वांसाठी खुला गट वयाच्या अटीशिवाय हा गट होता, दुसरा गट केवळ विद्यार्थी गट तर तिसरा दिव्यांग गट असा होता. प्रत्येक गटात अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. बहुसंख्य स्पर्धकांनी चित्रकला व रांगोळी अशा दोन्ही गटात आपापली कला सादर केली. दोन्ही गटात एकूण 46 स्पर्धकांनी भाग घेतला. नांदेड दक्षिण परिसरासह इतरही परिसरातील स्पर्धक या स्पर्धेत सामील झाले होते.
शाळा,महाविद्यालय, विविध सामाजिक संस्थासह व्यक्तिगत रुपात सुध्दा या स्पर्धेत स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. यामध्ये आस्था एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे नृसिंह राव दांडगे काँलेज आँफ पँरामेडिकल सायन्स, नांदेड, मुक्ता साळवे बहुउद्देशिय सामाजिक संस्था, नांदेड, निर्मिती नरसिंग काँलेज, नांदेड,म.न.पा.वजिराबाद शाळा, क्रमांक एक , महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर व विजय नगर, सैनिकी विद्यालय, शारदा नगर,सगरोळी, शिवशंकर माध्यमिक विद्यालय, बन्नाळी, देगलूर, कला महाविद्यालय, छ. संभाजीनगर, कला महर्षी त्र्यंबक वसेकर, चित्रकला महाविद्यालय, नांदेड अशा विविध संस्थेचे विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला. चित्रकला व रांगोळी स्पर्धेत एकूण 46 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
चित्रकला स्पर्धा विद्यार्थी गटात फुरखान बेग निर्मिती नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आला तर द्वितीय सिध्दी संतोष बरडे, महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर, तृतीय दिक्षा प्रकाश गजभारे, म.न.पा.प्रा.शा.क्रमांक एक वजिराबाद, नांदेड यांनी प्राप्त केला आहे. चित्रकला खुल्या गटात प्रथम क्रमांक बालाजी पेटेकर खतगावकर, माणिक नगर, द्वितीय क्रमांक आकाश संतोष वाघमारे तर तृतीय क्रमांक कृष्णा रामप्रसाद पिंपरणे यांनी प्राप्त केला आहे.
रांगोळी विद्यार्थी गटात प्रथम वैष्णवी त्रिशरण सोनकांबळे, म.न.पा.शाळा, वजिराबाद , द्वितीय रोहिणी राजेश पोहरे, निर्मिती नर्सिंग महाविद्यालय, नांदेड आणि तृतीय दिक्षा प्रकाश गजभारे, म.न.पा.प्रा.शा.वजिराबाद, यांनी प्राप्त केला. रांगोळी खुल्या गटात प्रथम बालाजी चन्नप्पा पेटेकर ,द्वितीय उज्ज्वला अभयकुमार भावसार-दांडगे आणि तृतीय प्रा.अरुणा लामतुरे यांनी प्राप्त केला.
दिव्यांग रांगोळी गटात गोदावरी जंगीलवाड, माणिक नगर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. परीक्षक म्हणून कविता जोशी, प्रा.राजेश कुलकर्णी व संजय भालके यांनी कार्य केले. सर्व यशस्वी स्पर्धकांना लवकरच एका कार्यक्रमात सन्मानपत्र देवून सन्मानित केले जाणार आहे. सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन 087 नांदेड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार प्रविण पांडे, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू जिल्हा स्वीप सदस्य तथा उपशिक्षणाधिकारी संतोष शेटकार, व पेशकार राजकुमार कोटुरवार यांनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रुस्तुम आडे, निर्मिती नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा.अभयकुमार दांडगे, एस.व्हि.भालके, हनुमंत राठोड, कविता जोशी, मुख्याध्यापक सुनील दाचावार, आर.जी.कुलकर्णी, सारिका आचमे व सुमित्रा वगवाड विशेष परिश्रम घेतले.