शिक्षण

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे पाच गटात आयोजन


नांदेड दि. 1 नोव्हेंबर :- राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तसेच विद्यार्थी, शिक्षक मोलीके यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-25 चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात आले आहे.


•पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या, सेविका व पर्यवेक्षिका).
•प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक).
•माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक).
•विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट.
•अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता).
ही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पहिल्या टप्प्यात वरील गट क्र. 1 ते 3 साठी जिल्हास्तरावर व गट क्र. 435 साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (विभाग) स्तरावर घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा ही सन 2024-25 साठी मराठी माध्यमासह इतर सर्व माध्यमातून शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.


या स्पर्धांचे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. त्याचा तपशील, कालावधी-दिनांक व स्वरूप असे राहील. जिल्हा समन्वयक यांची मार्गदर्शन बैठक 4 नोव्हेंबर 2024 रोजी ऑनलाईन स्वरुपात राहील. नवोपक्रम नोंदणी 4 ते 20 नोव्हेंबर कालावधीत स्पर्धकांनी ऑनलाईन पोर्टलवर सादर करणे. छाननी (पात्र/अपात्र) 21 ते 27 नोव्हेंबर कालावधीत ऑनलाईन राहील.
टप्पा क्र. 2 चे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल. जिल्हास्तर गट 1 ते 3 पहिली फेरी ऑनलाईन अहवाल परीक्षण 9 ते 20 डिसेंबर कालावधीत ऑनलाईन स्वरुपात असून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे आयोजक असतील.


दुसरी फेरी ऑफलाईन सादरीकरण 13 ते 31 डिसेंबर कालावधीत ऑनलाईन स्वरुपात असून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे आयोजक असतील.
विभागस्तर गट 4 ते 5 पहिली फेरी ऑनलाईन अहवाल परीक्षण 16 ते 27 डिसेंबर कालावधीत असून ऑनलाईन स्वरुपात प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे आयोजक असतील.
दुसरी फेरी ऑफलाईन सादरीकरण 1 ते 9 जानेवारी 2025 या कालावधीत ऑनलाईन स्वरुपात असून प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे आयोजक असतील.


राज्यस्तर गट 1 ते 5 पहिली फेरी ऑनलाईन अहवाल परीक्षण 15 ते 31 जानेवारी 2025 कालावधीत ऑनलाइन स्वरुपात असून क संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे हे आयोजक असतील.
तर दुसरी फेरी ऑफलाईन सादरीकरण 3 ते 7 फेब्रुवारी 2025 या कालावधीत असून क संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे हे आयोजक असतील, अशी माहिती नांदेडचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार यांनी दिली आहे. 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button