क्राईम

अल्पवयीन बालकाकडुन चोरीच्या दोन व एक बेवारस मोटरसायकल जप्त

 

मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री. किरतीका एम.एस. सहाय्यक पोलीस अधिक्षक, उप विभाग नांदेड शहर यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे स्वाधीन अधिकारी व गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना देऊन जास्तीत जास्त मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणावेत अशा सुचना दिल्या आहेत.

सदर सुचनांचे अनुषंगाने परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, नांदेड यांनी वजीराबाद गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी आर.डी. वटाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हयांचे घटनास्थळी भेट देऊन तेथील सिसिटीव्ही कॅमेरे चेक करुन आरोपीतांचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे काल दिनांक 16.05.2024 रोजी सपोनि आर.डी. वटाणे, पोहेकॉ/11 शरद सोनटक्के, पोहेकॉ/591 माधव नागरगोजे, पोकॉ/3088 बालाजी कदम, पोकॉ/2896 शेख ईम्रान, पोकॉ/3136 रमेश सुर्यवंशी, पोकॉ/14 भाऊसाहेब राठोड, पोकॉ/3113 अंकुश पवार, पोकॉ/329 मेघराज पुरी असे मोटरसायकल चोरटयांचा शोध घेत असतांना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक अल्पवयीन बालक आपले ताब्यात बिनाक्रमांकाचे मोटरसायकल घेऊन जात असतांना आढळुन आल्याने त्यास थांबवून चौकशी केली असता सदरची मोटरसायकल चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरुन आम्ही त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी ईतर एक चोरीची मोटरसायकल काढुन दिली. सदर मोटरसायकल चोरीचे अनुषंगाने पोलीस ठाणे वजीराबाद, नादेड येथे गु.र.न. 109/2024 व 210/2024 कलम 379 भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

सदर मोटरसायकल चोरट्यांचा शोध घेत असतांना तीरंगा चौकातील शौच्छालयाचे बाजुस एक युनीकॉन कंपनीचे मोटरसायकल बेवारस स्थितीमध्ये असल्याची माहीती मिळाल्यावरुन सदर ठीकाणी पाहणी केली असता बेवारस अवस्थेत युनीकॉन मोटरसायकल मिळुन आली. त्याबाबत खात्री करता ती पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गु.र.न. 316/2024 कलम 379 भारतीय दंड विधान या गुन्हयातील असल्याची खात्री झाल्याने सदर मोटरसायकल नांदेड ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आली आहे.

वरीलप्रमाणे तीन मोटरसायकली व तीन गुन्हे उघडकीस आणले असल्याने वरीष्ठांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button