क्राईम

नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसिंग मधील 118 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत सायबर पोलीस स्टेशन नांदेडची कार्यवाही

 

नांदेड जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी जी. बी. दळवी पोलीस उप निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन यांना आदेशीत केले होते. त्यानुसार त्यांनी सायबर पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेणेची मोहीम राबविण्यात आली होती.

नादेड जिल्यातील पोलीस स्टेशनचे अंमलदार व स्थागुशाचे पथकाने जिल्हयातील गहाळ झालेल्या इतर जिल्हयातून व राज्याबाहेरील मोबाईलचा शोध घेवून एकूण 118 मोबाईल किंमत 18,85,000/- रूपयाचे मोबाईल हस्तगत केले आहेत त्यांचे आज एकत्रितरीत्या मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक, नांदेड यांच्या हस्ते 60 मोबाईलचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत हस्तगत झालेले मोबाईलचे IMEI क्रंमाकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे Facebook Page (Nanded Police), Twitter (#Nanded Police) वर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रंमाक ओळखुन सायबर पो.स्टे. नांदेड येथून मोबाईल घेवून जाण्याचे अवाहन मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक यांनी केले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार नांदेड, डॉ श्री खंडेराय धरणे अपर पोलीस अधिक्षक भोकर, श्रीमती डॉ अश्विनी जगताप पोलीस उपअधिक्षक (गृह), पो नि जगदिश भंडरवार आगुशा. पो नि श्री उदय खंडेराय स्थागुशा, यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे. चे पोउपनि गंगाप्रसाद दळवी व पोलीस अंमलदार सुरेश वाघमारे, राजेन्द्र सिटीकर, दिपक ओढणे, रेशमा पठाण, विलास राठोड, दाविद पिडगे, गणेश वाघमारे, किरणकुमार वाघमारे, कृष्णा तलवारे, बालाजी सातपूते, मोहमद आसीफ, एजाजखान पठाण, काशिनाथ कारखेडे, अनिल बिरादार, दिपक शेवाळे, किशोर जैस्वाल, राजीव बोधगिरे, विलास कदम, अकबर पठाण, व्यंकटेश सांगळे, दिपक राठोड यांनी पार पाडली, सदर कामगीरी बाबत मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदाराचे अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button