जिला

मनरेगा कामांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली पाहणी

 

नांदेड,१६ मे- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत नांदेड तालुक्‍यातील मरळक व खडकी येथे सुरु असलेल्या विaविध कामांची मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी बुधवार दिनांक १५ मे रोजी पाहणी केली.

पाहणी दरम्यान सीईओ मिनल करनवाल यांनी कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला आणि कामगारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्‍यांनी मनरेगा योजनेंतर्गत सुरू असलेल्या सिंचन विहिरी, पाणंद रस्ते, पेवर ब्‍लॉक, गोठे आदी कामांची तपासणी केली.

यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी कामगारांच्या सुविधा व अडचणीही जाणून घेतल्या तसेच त्‍यांच्‍यांशी संवाद साधला. यावेळी त्‍यांनी मरळक व वडवणा अतंर्गत खडकी गावांना भेट देवूवन कामांची पाहणी केली. सीईओंच्या या दौऱ्यामुळे मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीतील कार्यक्षमता वाढीसह योजनेच्या कामांत गती मिळेल असे ग्रामस्थांनी सांगीतले. यावेळी मनरेगाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, गट विकास अधिकारी पी.के. नारवटकर, विस्‍तार अधिकारी व्‍ही.बी. कांबळे, सतीश लकडे, सीईओ यांचे स्‍वीयसहाय्य शुभम तेलेवार, मनरेगाचे रहाय्यक कार्यक्रम अधिकारी चेतन जाधव, राहूल लोंढे, ग्रामसेवक अमित उगले, सरपंच व गावकरी यांची यावेळी उपस्थिती होती.

 

नांदेड पंचायत समिती आयएसओ करा

दरम्‍यान मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पंचायत समिती नांदेड येथे भेट दिली. योवेळी त्‍यांनी विविध विभांगाना भेटी दिल्‍या. पंचायत समितीची गुणवत्‍ता, कार्यक्षमता व पारदर्शकता वाढवण्‍यासाठी पंचायत समिती आयएसओ करण्‍याच्‍या सूचना मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिल्‍या. यावेळी गट विकास अधिकारी पी.के. नारवटकर यांच्‍यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button