नागेश पाटील कल्याण हे व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्य सेवा विशेष पुरस्काराने सन्मानित
नायगाव/प्रतिनिधि – साई शिर्डी च्या पावन भूमीत नुकतीच पार पडलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या विश्वव्यापी पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात ग्रामीण पत्रकार चळवळीतील व्हाॅईस ऑफ मीडिया चे नायगाव तालुकाध्यक्ष नागेश पाटील कल्याण यांना सेवा कार्य विशेष पुरस्कार सन्मान २०२४ ने गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर बीडच्या माजी खासदार प्रितम मुंडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर,माजी खासदार हेमंत पाटील, दै. देशोन्नती चे संपादक प्रकाश पोहरे, जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, पुढारी वृत्त वाहिनीचे प्रसन्न जोशी, राजश्रीताई पाटील, व्हाॅईस ऑफ मीडिया चे संस्थापक अध्यक्ष संदीप भाई काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के* प्रदेश कार्यवाहक बालाजी मारगुड, मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया, पंढरिनाथजी बोकारे, नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी, बाळासाहेब पांडे आदींसह संघटनेचे देश व विदेशातील पदाधिकारी सदस्य आणि राज्यभरातील हजारो पत्रकार बांधवांची उपस्थिती मोठी उपस्थिती होती. साई शिर्डी च्या दरबारी ३१ ऑगस्ट १ सप्टेंबर या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिखर अधिवेशनाद्वारे राज्य भरातील पत्रकारांसाठी दोन दिवसीय विशेष मेजवानी देत त्यांची प्रश्न पत्रकारीते पुढिल आव्हाने यावर विशेष मंथन करित यातुन निष्पन्न चर्चेतुन वेगवेगळे आठ ठराव मंजूर करून संघटनेद्वारे शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे निर्णय हि घेण्यात आले.
अशा व्यापक अधिवेशनात नायगाव व्हाॅईस ऑफ मीडिया च्या सेवा कार्याची विशेष दखल घेऊन ग्रामीण पत्रकार चळवळीतील अग्रगण्य पत्रकार व्हाॅईस ऑफ मीडिया चे नायगाव तालुकाध्यक्ष नागेश पाटील कल्याण यांना व्हाॅईस ऑफ मीडिया चा सेवा कार्य विशेष पुरस्कार सन्मान २०२४ ने गौरविण्यात आल्याने नायगाव व्हाॅईस ऑफ मीडिया टिमचे सर्वत्र कौतुक करून नागेश पाटील कल्याण यांना पुढिल वाटचालीसाठी सर्वस्तरातून शुभेच्छा हि देण्यात येत आहेत.