कलेची जोपासना करून मनुष्य परिपूर्ण आयुष्य जगू शकतो – डॉ.मनोज बोरगावकर
नांदेड दि. 13 कलेची जोपासना करून कोणताही व्यक्ती परिपूर्ण आयुष्य जगू शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डाॅ.मनोज बोरगावकर यांनी केले ते देगलूर नाका येथील कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. देगलूर नाका येथील कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक संमेलनाची सुरुवात आज झाली यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे प्रा.डी.बी. जांभरुणकर हे होते तर प्रमुख उपस्थिती संस्था सचिव अर्जुमंदबानो यास्मिन यांची होती.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.पुष्पा क्षीरसागर यांनी करून दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.उस्मान गणि यांनी केले.
पुढे बोलताना डॉ.मनोज बोरगावकर म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने कोणत्या ना कोणत्या कलेची जोपासना केली पाहिजे कारण कला ही मनुष्याच्या आयुष्याला पूर्णत्व प्राप्त करून देत असते.व्यक्ती पोटाची खळगी भरण्यासाठी विविध प्रकारचे व्यवसाय करतो,पण प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कलेची जोपासना करत असते त्यातून त्याचे आयुष्य समृद्ध होते. जीवन जगत असताना व्यक्तींनी बेगडीरूप धारण न करता वास्तवदर्शी वर्तन करूनच जीवन जगले पाहिजे तरच त्या व्यक्तीची ओळख ही मृत्यूनंतरही चिरकाल टिकून राहत असते.यावेळी संस्था सचिव प्रा.अर्जुमंदबानो यास्मिन यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप करताना प्रा.डी.बी. जांभरुणकर यांनी विद्यार्थ्यांना श्रम,सचोटी आणि मेहनतीने जीवनात मार्गक्रमण करून यशस्वी व्हावे असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.स्मिता कोंडेवार यांनी केले तर आभार प्रा.डाॅ.बाबासाहेब भुक्तरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.सय्यद वाजीद,प्रा.मो.इस्माईल,प्रा.मोहम्मद दानिश,प्रा.शेख नजीर शेख पाशामियाँ,प्रा.निजाम इनामदार,प्रा.सय्यद फराज, प्रा.अक्षय हासेवाड,प्रा.शेख असिफ,प्रा.अजमत बेगम, प्रा.डाॅ.फर्जाना बेगम,प्रा. तर्रनुम चिश्ती,प्रा.सनोबर, प्रा.शबाना,प्रा.समीना खान,प्रा.जवेरीया,प्रा.इप्तेसाम ,प्रभावती नवसागरे,सचिन जोंधळे सर,आदित्य भोंग,आयेशा बेगम,आशाबाई,मोहम्मदी बेगम यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.