शिक्षण

एक संवेदनशील शिक्षक शेख एजाज सर !

 

      शासकीय आणि निमशासकीय सेवेत कार्यरत असणाच्या कर्मचाऱ्यांना एक नियत वय असते. वयाचा तो पल्ला गाठला की सेवानिवृत्ती ! ही सेवानिवृत्ती गाठण्यासाठी अनेकांना खूप कांही करावे लागते. तर कुणाला सेवानिवृत्तीचा पल्ला जवळ आल्याचेही कळत नाही. ते आपले आपल्या दैनंदिन चाकोरीबद्ध कामात व्यस्त असतात. कुणाकुणाला तर आठवण करून द्यावी लागते की, तुम्ही अमुक वर्षी अमुक वेळी सेवानिवृत्त होत आहात.

   शेख एजाज सर मदिनतुल उलूम शाळेचा नांदेड संस्थेच्या चाकोरीबद्ध सेवेतून निर्धारित नियतः वयानुसार दिनांक 31/01/2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. विश्वास बसत नाही. त्यांची शरीर प्रकृती आणि त्यांच्या अॅक्टीव्हिटीज कडे पाहून ते नियत सेवानिवृत्तीच्या वयापर्यन्त पोहोचले आहेत असे वाटत नाही. असो, असतात काही चोरट्या वयाची माणसं. त्यात शेख एजाज ही ! असेच म्हणावे लागेल.

   शेख एजाज यांची सेवानिवृत्ती तर नक्कीच होत आहे. यात वाद नाही. पण माझ्या समोर प्रश्न आहे तो कशा कशात सेवानिवृत्त होणार आहे? शेख एजाज एक सेवा अनेक. शेख एजाज मैलाचा दगड आहे. तो चौरंगी चिरा आहे. कुठेही, कसाही बसवा, बसणारच! कलेचा फड, लेखणीची कसरत असो की चित्रकला केवळ शिक्षण नव्हे अनेक क्षेत्रात आहे. उर्दू कॅलिग्राफी डिझाईन, कम्प्युटरचे कोणतेही काम असो ऑनलाइनचे सर्व कामे असो Computer Software आणि Hardware यामध्येही कौशल्य प्राप्त केलेले आहे. इंग्रजी मराठी आणि उर्दू भाषेचे चांगले ज्ञान आणि शैक्षणिक तसेच कार्यालयीन कामकाज अशैक्षणिक कर्तव्य पार पाडण्याची क्षमता आहे. तसेच उर्दू भाषेमध्ये तर त्याच्या कुणी सानी नाही ते अनेक मराठी पुस्तकांचे उर्दूमध्ये भाषांतर केलेले आहेत. तसेच सोरा मीडियाने  मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस या मान्यवर नेत्यावर मराठीमध्ये लिहिलेल्या पुस्तकांचे उर्दूमध्ये उत्कृष्टपणे भाषांतर करून दिले. या पुस्तकांचे याच मान्यवर लोकांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. सरांना प्रत्येक विषयांचे पुस्तके वाचण्याच फार मोठा छंद आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक विषयाचा ज्ञान फार दांडगा आहे. त्यानी आपल्या घरामध्ये पुस्तकांचे स्वतःचे ग्रंथालय तयार केलेले आहे. समाजातील अनेक क्षेत्रात ज्यांनी आपला प्रभाव दाखविला त्यात शेख एजाज या पैकी एक आहेत.

         गेल्या 30 वर्षापासून सर माझे घनिष्ठ मित्र आहेत. ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते. एक दिलदार माणूस, प्रेमळ, सुसंस्कृत, कामात शिस्त, आचरणात शिस्त व जबाबदारपणा या सर्व गुणांचे मिश्रण म्हणजे आमचे आवडते आदरणीय शेख एजाज सर आहेत. त्यांच्यापासून मला खुप काही

शिकण्यास मिळालेले आहे. यांचे अमूल्य मार्गदर्शन व सहकार्य, त्यांच्या प्रयत्नामुळे मी माझे तीन पुस्तके प्रकाशित करू शकलो. जे आज पर्यंत पंचवीस हजार पर्यंत पुस्तके विकली गेली आहेत. यांचे सर्व श्रेय सरांना जाते. माझ्यासारख्या अनेक लोकांना त्यानी आपण पडद्या आड राहून लोकांना पुढे नेलेले आहे. आपल्या सोबत दुसऱ्यांचेही चांगलं व्हावं अशी मानसिकता त्यांच्या अंगी आहे, जे माझ्यासाठी मोठे प्रेरणास्थान आहेत.  

        एजाज सरांची नियुक्ती पासून आजपर्यंत दरवर्षी शासकीय ग्रेड परीक्षेत शंभर टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होतात. तसेच मदिनतुल उलूम शाळेला पुढे नेण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले. त्यांनी शाळेसाठी अहोरात्र व अनेक उन्हाळी, दिवाळी सुट्ट्या अर्पण केले आहे. शाळेमध्ये वृक्षारोपण करून आज शाळेची सुंदरता वाढवली आहे. तसेच शाळेतील बांधकाम असो ऑनलाईनचे काम असो किंवा कोणता ही उपक्रम सर्व जबाबदारीने नियोजन करून उत्तमरीत्या पार पाडलेले आहेत. त्यांची प्रतिभा पाहून त्यांच्या संस्थेने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवले आहेत. त्या त्यांनी अतिशय सक्षमतेने पार पाडलेले आहेत. आजपर्यंत मी त्यांना शाळेतील कोणत्याही कामांमध्ये कुचराई करताना पाहिलेले नाही. त्यांचे सर्व प्रयास हे केवळ शाळेच्या हितासाठी आहे. सरांची काम करण्याची हातोटी वेगळीच आहे. संबंध तर जोपासतातच पण आपल्या कार्यात, कामात संबंधाचे कोणतेही परिणाम कामावर होणार नाही याची काळजी नक्कीच घेतात. अगदी सहज व सोप्या पद्धतीने काम कसे करावे हे समजावून सांगण्याचे कौशल्य त्यांच्याकडूनच शिकावे.

           शेख एजाज म्हणजे बंधुतुल्य व्यक्तिमत्व, हितचिंतक, विद्यार्थिप्रिय, उपक्रमशिल आदर्श कलाशिक्षक, उत्तम तंत्रस्नेही  अष्टपैलू ,सुस्वभावी, ते स्वतःसह सर्वांना हितकारक ठरावे या भावनेने त्यांचा प्रवास झालेला आहे. आज एजाज सरांना शिक्षण सेवेतून सन्मानपूर्वक निरोप मिळत आहे, हीच त्यांच्या सेवेची खरी उपलब्धी असावी; असे वाटते. अल्लाहतालासे प्रार्थना आहे कि शेख एजाज भावी जीवनात सुख- शांती, समृद्धी आणि निरोगी आयुष्य तसेच त्यांचे जीवनही आनंदीत, समाधानाचे, भरभराटीचे, होवो. तुमची सर्व स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण होवो. हीच आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा.

त्यांच्या या कार्यात सदा यश मिळो. त्यांचे नाव लौकिक वाढो…

शुभेच्छुक- शेख जाकिर (कलाशिक्षक) फैजुल उलूम हायस्कूल, गोकुळ नगर नांदेड.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button