हिमायतनगर रेल्वे स्थानकाला नांदेडच्या रेल्वे विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी दिली अचानक भेट
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रेल्वे स्थानकाला नांदेड डिव्हिजन रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी बुधवारी अचानक भेट देऊन रेल्वे स्थानक व परिसराची पाहणी केली. यावेळी रेल्वे विभागाची जागा किती आहे याचे मोजमाप करून माहिती घेतली. तसेच रेल्वे स्थानकावर सुरु असलेल्या शेडच्या कामात होत असलेल्या दिरंगाई बाबत संबंधित ठेकेदाराला ताकीद देऊन वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने बांधकाम पूर्ण करा अश्या कडक सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस, रेल्वेचे आणि बांधकाम संबंधीचे अभियंता, गुत्तेदार अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुधवार दि.७ फेब्रुवारी रोजी रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी सकाळी ११.३० वाजता हिमायतनगर रेल्वे स्थानकाला विशेष रेल्वेने भेट दिली. रेल्वेतून उतरताच हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांच महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्याहस्ते पुष्पगुच्छ व श्री परमेश्वराची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने नव्याने होणाऱ्या रेल्वे स्थानक इमारत आणि मुख्य कमानीवर श्रीक्षेत्र परमेश्वराची मूर्ती लावण्यात यावी अशी मागणी केली. मागणीला उत्तर देताना त्यांनी मूर्तीचा प्रश्न मार्गी लावू मात्र त्या मूर्तीचे पावित्र जपण्याचे काम मंदिर कमिटीने करावे तरच याचा विचार केला जाईल असे सांगून रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. तसेच स्टेशन मास्तर यांना रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याच्या कडक सूचना दिल्या.
त्यानंतर रेल्वे स्थानक व परिसरात सुरू असलेल्या शेडच्या कामाच्या बाबतीत प्रकाशित झालेल्या बातम्यांची दखल घेऊन सदरील कामाचे निरीक्षन केले. यावेळी कामात होत असलेल्या हलगर्जीपणा आणि कामाचा दर्जा याबाबतची तक्रार भाजपा युवामोर्चा माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराने, सामाजिक कार्यकर्ते दशरथ हेंद्रे यांनी केली. यावेळी विभागीय व्यवस्थापन नीती सरकार यांनी संबंधित ठेकेदाराला होत असलेले कामाची कोणती तक्रार आली नाही पाहिजे. येथील स्थानकातील शेडचे व फाउंडेशनचे काम दर्जेदार पद्धतीने करा. खोदण्यात आलेल्या खड्डयांमुळे कोणत्याही नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करा अशा कडक सूचना केल्या.
यावेळी हिमायतनगर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद गोडसेलवार यांच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात रेल्वे स्थानकांचे दररोजचे उत्पन्न 1 लाख ७० हजारच्या आसपास आहे. दररोज विदर्भातील उमरखेड डेपोची बस दोन वेळा हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशी घेऊन येते. त्यामुळे हिमायतनगर तळवे स्थानकातून येतुन ये- जा करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या वाढली आहे. हि बाब लक्षात घेता धनबाद एक्स्प्रेस गाडीला हिमायतनगर स्थानकावर थांबा देण्यात यावा. कोरोना काळापासून पासून बंद झालेले पार्सल ऑफिस चालू करण्यात यावे. नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत सोडन्यात यावी, हिमायतनगर रेल्वे स्थानकावर महिलांसाठी शौचालय व वेटिंग हॉल उपलब्ध करावे.
रेल्वे स्थानक व रेल्वेत होणाऱ्या चोरीवर आळा घालण्यासाठी येथे पोलीस चौकी स्थापन करून जनरल वेटिंग हॉल उपलब्ध करून द्यावे. रेल्वे स्थानक परिसराची साफसफाई कर्मचारी नसल्याने घाणीचे साम्राज्य होते त्यावर नियंत्रण ठेवावे. नांदेड – किनवट पर्यंत शटल गाडी दररोज सोडण्यात यावी, टेम्भी रस्त्यापासून स्टेशन पर्यंत रेल्वेच्या हद्दीत रोड करण्यात यावा, रेल्वे स्थानकावर असलेली पाणी टंचाई दूर करून पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करून अपंगत्व असलेल्या व्यक्तीना सुविधा देण्यात यावी यासह अनेक मागण्या करण्यात आल्या. यावेळी मंदिर कमिटीचे संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, संतोष गाजेवार, वामनराव मिराशे, गजानन हरडपकर, साहेबराव चव्हाण, पापा पार्डीकर आदींसह गावातील जागरूक नागरिक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.