गावठी पिस्टल अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुसासह एक ताब्यात स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई
स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी दिनांक 08/02/2024 पोउपनि आनंद बिचेवार यांचे टिमला नांदेड शहरात पाहीजे व फरारी आरोपी शोध करुन त्यांना अटक करण्याचे आदेश देवुन रवाना केले होते.
श्री आनंद बिचेवार पोउपनि स्थागुशा यांचे टिम पाहीजे व फरारी आरोपीस शोध व आरोपीस चेक करीत असतांना पोउपनि श्री आनंद बिचेवार यांना माहीती मिळाले की रेकॉडवरील आरोपी नामे मोहीत ऊर्फ चिकु पि. रमेश गोडबोले रा. देगावचाळ नांदेड याचेकडे एक पिस्टल व काडतुस आहेत तो गोदावरी नदी परीरातील डंकीन भागात आहे असी खात्रीशीर माहीती मिळाले वरुन त्यांनी त्यांचे सोबतचे अमलदार व पंचासह गोदावरी नदी परीसर डंकीन कडे सदर आरोपीचा शोध करुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव त्याने त्याचे नाव मोहीत ऊर्फ चिकु पि.रमेश गोडबोले वय 21 वर्षे व्यवसाय बेकार रा. देगावचाळ नांदेड असे सांगीतले त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता याचे कमरेला एक अग्निशस्त्र (गावठी कट्टा) व एक जिवंत काडतुस किमती 26,000/- रुपयाचे अग्निशस्त्र मिळुन आले सदर आरोपी विरुध्द पोउपनि श्री आनंद बिच्चेवार यांनी पो.स्टे. वजिराबाद येथे फिर्याद दिली आहे. सदर आरोपी विरुध्द पो.स्टे. वजिराबाद व विमानतळ येथे गुन्हे दाखल असुन तो पो.स्टे. वजिराबाद येथील दोन गुन्हयात फरार होता.
सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि / आनंद बिचेवार, पोलीस अमलदार गंगाधर कदम, संजीव जिंकलवाड, तानाजी येळगे, मोतीराम पवार, गजानन बयनवाड यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.