गावठी कट्टा अग्नीशस्त्र सहा एकला अटक इतवारा पोलीसची कारवाई
नांदेड जिल्हयाती गुनहेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहिती काढून त्यांचेविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्या बाबत. मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक इतवारा नांदेड यांना आदेशीत केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक इतवारा नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपी विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्या बाबत. इतवारा पोलीस स्टेशनच्या टिमला आदेश दिला होता.
दिनांक:- ०६/०२/२०२४ रोजी इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस, पोलीस हवलदार शेख वाजीद यांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, मालटेकडी ते देगलुर नाका जाणारे रोड लगत खुबा मस्जीद समोर रोडवर नांदेड येथे एक ईसम एक गावड्डी बनावटीचे पिस्टल स्वता:चे ताब्यात बाळगुन थांबला आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी तशी माहिती वरीष्ठांना देवुन पोलीस स्टेशन इतवारा नांदेडचे पथकाने सापळा रचुन एक आरोपी कडुन दोन पंचा समक्ष एक गावठी कट्टा / पिस्टल अग्नीशस्त्र किमंती अंदाजे १०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपीतास पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथे गुरनं ३७/२०२४ कलम ३/२५ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे दाखल करुन आरोपीतास अटक करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा.श्री अबिनाशकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा नांदेड, यांचे मार्गदर्शना खाली मा.श्री संतोष तांबे पोलीस निरीक्षक इतवारा नांदेड, श्री आयुब शेख पोलीस उप निरीक्षक, श्री रमेश गायकवाड पोलीस.उप. निरीक्षक व पोलीस अंमलदार शेख वाजीद, धिरजकुमार कोमुलवार, सुमेध पुंडगे, मारोती गित्ते पोलीस स्टेशन इतवारा नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.