क्राईम

विधीसंघर्षीत बालकाकडुन 01 अग्नीशस्त्र व 01 जिवंत काडतुस जप्त स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही

 

नांदेड जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था. गु. शा. चे टिमला आदेश दिले होते.

दिनांक 07/02/2024 रोजी स्थागूशा चे पोउपनि / दत्तात्रय काळे यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, काळेश्वर मंदीर परीसरात, नांदेड येथे एक इसम विक्रीसाठी एक गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी स्वतःचे ताब्यात बाळगुन आहे, अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन एक विधीसंघर्षीत बालकाकडुन त्याचे नातेवाईकासमक्ष व पंचासमक्ष एक अग्नीशस्त्र (गावठी कटा) व 01 जिवंत काडतुस असा एकुण किंमती 25,600/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन नमुद विधीसंघर्षीत बालकाविरुध्द पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि दत्तात्रय काळे, पोलीस अमंलदार बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, किशन मुळे, विलास कदम, रणधीर राजबन्सी, गणेश धुमाळ, मोतीराम पवार, हेमंत बिचकेवार स्थागुशा, नांदेड, सायबर सेलचे राजु सिटीकर व दिपक ओढणे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button