जिला
मोदी सरकारचे संविधानावर हल्ले: संविधान आयसीयुमध्ये, संविधान वाचविण्यासाठी जनतेनी पुढे यावे-माजी खासदार वृंदा करात
किनवट,(प्रतिनिधी): संविधान विरोधी धोरणे अमलात आणून देशाचे सरकार हे वेळोवेळी संविधानावर हल्ला करीत आहे.यामुळे आज संविधान ‘आयसीयु’, मध्ये आहे.अशा परिस्थितीत संविधानाची प्राणप्रतिष्ठापणा करणे गरजेचे आहे.आता जनताच संविधानाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाही,असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पाॅलिट ब्युरो चे सदस्य,माजी खासदार वृंदा करात यांनी केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज(ता.२२) दुपारी एक वाजता हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघुनाथशहा मैदानावर जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या.अध्यस्थानी शेतकरी नेते अर्जुन आडे हे होते.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की,भारत हा आमचा धर्म निरपेक्ष देश आहे.संविधानानुसार धर्म व राजकारण हे वेगळे आहे.परंतु,आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी राम मंदिराच्या उद्घाटनाला मुख्य पुजारी म्हणून पुजा केली आहे.आमच्या पक्षालाही निमंत्रण होते .धर्माचे राजकारण आमाला करायचे नव्हते म्हणून आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो नाही.
मोदी हे आपके बार ४०० पार असे म्हणत आहेत. परंतु,त्यांना साधे बहुमत मिळण्याची शक्यता नाही.म्हणून ते आयटी,ईडी व सीबीआय या यंत्रणेचा गैरवापर करून विरोधी पक्षाला फोडत आहेत.
या भागात होणारे चिमटा धरण हे विकासासाठी नसून विनाशासाठी होत आहे.या धरणामुळे ९५ गावे ही देशोधडीला लागणार आहेत.यामुळे आमचा या धरणाला विरोध आहे.धरण विरोधी कती समितीच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ देणार आहोत.किनवट हा जिल्हा झालाच पाहिजे,अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे.या मागणीला आमचा पाठिंबा आहे.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सचिव मंडळाचे सदस्य किसन गुजर, डॉ.बाबाराव डाखोरे,उज्वला पडलवार,मुबारक तंवर, प्रल्हाद पाटील जगताप,विजय गाभणे,यांची समयोचित भाषणे झालीत.प्रास्ताविक शंकर सिडाम यांनी, सूत्रसंचालन स्टॅलिन आडे यांनी,तर आभार प्रदर्शन गंगाधर गायकवाड यांनी केले.
यावेळी प्रल्हाद गावंडे, जनार्दन काळे, प्रल्हाद चव्हाण,आडेलु बोनगिर,नंदु मोदकवार, शिवाजी गायकवाड,रवि भगत, प्रफुल्ल कवंडकर,किशोर पवार,मोहन जाधव,इरफान पठाण,शोभा डाखोरे,बंडूसिंग नाईक,गौतम भालेराव ,भारत वाडगुरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
सभेस किनवट, माहूर तालुक्यातसह जिल्ह्यातील जवळपास पाच हजार नागरिकांची उपस्थिती होती.यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सभेपुर्वि रेल्वे स्टेशन येथून सभा मंडपापर्यंत शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढण्यात आली.