देश विदेश

राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना दणका, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, मनसेत जाहीर प्रवेश

 

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला धक्का दिला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटामधील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला आहे.

शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती धरला आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशातच भिवंडीतील शिंदे गटातील पदाधिकारी मनसेत गेल्याने शिवसेना-भाजप महायुतीला भिवंडीत मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभेचे उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांचे नेतृत्वाखाली भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहर प्रमुख महिला आघाडी, तालुका प्रमुख महिला आघाडी व शहापूर मधील इतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होत आहे.

सध्या भिवंडीतून भाजपचे खासदार असलेले कपिल पाटील हे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आहेत. तर भिवंडी लोकसभेमध्ये नुकत्याच राष्ट्रवादीत गेलेल्या बाळ्या मामांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांची ताकदही या मतदारसंघात आहे. त्यामुळे आता महायुतीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हं आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button