देश विदेश

अजमेर येथील 811 व्या उर्स करिता विशेष गाड्या

अजमेर येथील 811 व्या उर्स करिता होणाऱ्या गर्दी ला लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवीत आहे, त्या पुढील प्रमाणे : —
क्र. गाडी क्र. कुठून – कुठे गाडी सुटण्याचा दिनांक
1 07125 हैदराबाद – मदार 26.01.2023
2 07126 मदार – हैदराबाद 31.01.2023
3 07129 काचीगुडा-मदार 26.01.2023
4 07130 मदार – काचीगुडा 31.01.2023
5 07641 नांदेड-अजमेर 27.01.2023
6 07642 अजमेर-नांदेड 01.02.2023

1) गाडी क्र. 07125/07126 हैदराबाद – मदार – हैदराबाद विशेष गाड्या :
हि गाडी हैदराबाद येथून 26 जानेवारी ला सायंकाळी 17.30 ला सुटेल आणि मदार येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 05.00 वाजता पोहोचेल. या विशेष गाड्या सिकंदराबाद, मलकाजगिरी, मेडचल, कामरेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, भोपाळ, संत हिर्दाराम नगर, माकसी, उज्जैन, नागदा, रतलाम, निमच, चित्तौडगड, चंदेरिया, भिलवाडा, बिजाईनगर, नसीराबाद आणि अजमेर येथे दोन्ही दिशांना थांबतील.

2) गाडी क्र. 07129/07130 काचीगुडा-मदार-काचीगुडा विशेष गाड्या :
हि गाडी काचीगुडा येथून 26 जानेवारी ला रात्री 23.00 वाजता सुटेल आणि मदार येथे तिसऱ्या दिवशी दुपारी 12.00 वाजता पोहोचेल. या विशेष गाड्या मलकाजगिरी, मेडचळ, कामरेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, भोपाळ, संत हिर्दाराम नगर, माकसी, उज्जैन, नागदा, रतलाम, निमच, चित्तौडगड, चंदेरिया, भिलवाडा, बिजाईनगर, नशिराबाद आणि अजमेर या स्थानकांवर दोन्ही दिशांना थांबतील.

3) गाडी क्र. 07641/07642 नांदेड-अजमेर-नांदेड विशेष गाड्या :
हि गाडी नांदेड येथून दिनांक 27 जानेवारी ला सकाळी 09.00 वाजता सुटेल आणि अजमेर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 15.00 वाजता पोहोचेल. या विशेष गाड्या पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, रोटेगाव, अंकाई, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, संत हिरडाराम नगर, माकसी, उज्जैन, नागदा, रतलाम, निमच, चित्तौडगड, चंदेरिया, भिलवाडा, बिजयनगर आणि नशिराबाद येथे दोन्ही दिशांना थांबतील.
या गाड्यांत द्वितीय वातानुकुलीत, तृतीय वातानुकुलीत, स्लीपर क्लास आणि जनरल क्लास चे डब्बे असतील.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button